मुंबई टू दिल्ली वारीत अडकला राज्याचा कारभार

केंद्रासह राज्यसरकावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचे टीकास्त्र
मुंबई टू दिल्ली वारीत अडकला राज्याचा कारभार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्यात महागाई आणि बेरोजगारी (Inflation and unemployment) वाढलेली आहे. महाराष्ट्रात जून महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rainfall) शेतकरी हतबल (Farmers desperate) व हैराण झाला आहे. संपूर्ण खरीप पिकांचे नुकसान (Damage to kharif crops) झाले आहे. मात्र, महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की शेतकर्‍यांकडे कोणीच लक्ष देत नाही. सध्या मुंबई टू दिल्ली (Mumbai to Delhi) वारीचा प्रवास करण्यामध्येच मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचा राज्याचा कारभार (Administration of the state) सुरु आहे, अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (District President of Congress) प्रदीप पवार यांनी केली.

जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्टदरम्यान काँग्रेसची पदयात्रा काढण्यासंदर्भात शनिवारी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य आ.डॉ.सुधील तांबे, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, शहर अध्यक्ष शाम तायडे, सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी,जमील शेख, मुफ्ती हारून नदवी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदीप पवार पुढे म्हणाले की, सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे.गॅस सिलिंडरचे चढते भाव,पेट्रोल व डिझेलचे वाढलेल्या किमतीमुळे देशातील सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टीमुळे फळबागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी खरडून निघाल्या आहेत. गाळ साचलेल्या शेतजमिनीची दुरुस्तीसाठी शासनाकडून मदत मिळणे अत्यावश्यक आहे.

परंतु गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रात मंत्रीमंडळ अस्तित्वात नसल्यामुळे शेतकर्‍यांना शासकीय मदत मिळणे दुरापास्त झाले आहे. आता मंत्रीमंडळ नसल्याने मंत्रालय ऐवजी सचिवालयाकडे कारभार देण्याचे काम सुरु आहे,असा टोला त्यांनी लगावला. तसेच महागाई विरोधात काँग्रेसने अप्पर जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रांती दिनापासून काँग्रेसची पदयात्रा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 9 ऑगस्टपासून ते स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टपर्यंत काँग्रेसची जिल्ह्यात पदयात्रा काढण्यात येणार आहे. महात्मा गांधींनी 1942 साली भारत स्वातंत्र्य करण्यासाठी करेंगे या मरेगे अशी घोषणा देवून ब्रिटीस सरकार हादरा दिला होता. तेव्हा भारतीयांमध्ये एक चळवळ निर्माण झाली होती. 1947 नंतरही ही चळवळ पहिले पंतप्रधान पंडित नेहरु, राजीव गांधी ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही हा वारसा कायम ठेवला,असेही आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी सांगितले.

प्रत्येक क्षेत्रात झालेला विस्तार हा काँग्रेसने रचलेल्या पायावर उभा आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली अनेक उघोग धंद्यांना चालना दिली. तसेच शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र, 2014 नंतर सर्व परिस्थिती आलबेल झाली आहे. लोकांनी निवडून दिले तर आमदार,खासदारांनी जनतेच्या हितासाठी चांगले कामे करा. मात्र, स्वातंत्र्यापासून लोकशाहीचे अस्तित्व उभे केलेल्या लोकशाहीवर घाला घातला जात असल्याची टीका आमदार.डॉ.सुधीर तांबे यांनी केली.

देशात लोकशाहीची पायमल्ली

देशभरात महागाई आणि ईडीच्या तपास यंत्रणांचा गैरवापर करणे सुरु आहे. यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेची आणि लोकशाहीची पायमल्ली होत असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला. महाराष्ट्रात आर्थिक शक्तीच्या बळावर महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे षड्यंत्र रचले. तसेच इतर काँग्रेस शासित राज्यात असे प्रयोग करुन भाजपने राजकीय पोरखेळ सुरु केला आहे,असा आरोपही पवार यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com