Photo सुवर्णनगरीत श्रीराम रथोत्सवाला प्रारंभ

Photo सुवर्णनगरीत श्रीराम रथोत्सवाला प्रारंभ

जळगाव - jalgaon

‘प्रभू सियावर रामचंद्र की जय, राम राम जय श्री राम, रामचंद्र हनुमान की जय’ अशा गगनभेदी जयघोषात सनई, चौघड्याच्या निनादात कार्तीकी एकादशीनिमीत्त श्रीराम मंदिर संस्थानचा श्रीराम रथोत्सवाला मोठ्या चैतन्यमय वातावरणात सुरूवात झाली.

रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची सकाळपासूनच मांदियाळी सुरू आहे. त्यामुळे रथोत्सवाच्या मार्गाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होवून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थांतर्फे कार्तीकी एकादशी निमीत्त श्रीराम रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहाटे ४ वाजता काकडा आरती व प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता श्रीराम मंदिर संस्थांनचे विश्‍वस्त गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते शारदा वेद पाठशाळा व शहरातील समस्त ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्या घोषात रथाची व उत्सवमुर्तीची महापुजा करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com