नांद्रा ता.पाचोरा - वार्ताहार Pachora

"गाव तिथे युवासेना" या अभियाना अंतर्गत आगामी काळात तरुणांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमात युवासेना मार्फत प्रत्यक्ष सहभागी होऊन ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणेसाठी गावागावात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र उभे करुन उच्च पदावर जाऊन अधिकारी व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करुन युवासेनेतील तरुणांना आमदार किशोर पाटील यांनी मार्गदर्शन केले

याबरोबरच लवकरच शिवसेनेत देखील मोठे फेरबदल करण्याचे संकेत यावेळी बैठकीत दिले तर जुन्या शिवसेना पदाधिकारी यांनी मोठ्या मनाने नवीन लोकांना संघटनेचे काम करायची संधी द्यावी तर युवासेनेतील चांगल्या युवासेना पदाधिकारी यांना शिवसेनेत संधी तर नवीन युवकांना युवासेनेत संधी देण्याचे स्पष्ट केले याबरोबरच पंचायत समितीमधील एका विहीरीमागे तिस हजार रू तर गोठाशेड मंजुरीसाठी दहा हजार रु घेऊन अनेकांना गंडा घालण्यात आला तरी अजुन विहीरी मंजुर झालेल्या नाहीत तर अशा लुटणारे लोकप्रतिनिधी यांना जवाब भर चौकात जनतेने विचारला पाहिजे असे सांगितले.

याबरोबरच गेल्या निवडणूक मिळालेल्या कमी मताधिक्या विषयी उपस्थितीत पदाधिकारी यांनी चर्चा विनिमय करुन भविष्यात आज झालेल्या चुका होऊ नये म्हणून आज पासूनच रणनिती अवलंबून ग्राम पंचायत व पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी सांगोपाण चर्चा घडवून आणून उपस्थित पदाधिकारी यांनी भाषणातून मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय पाटील, गणेश पाटील सर तसेचं तालुकाप्रमुख शरद पाटील शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर मा.पं.स सदस्य पंढरीअण्णा पाटील सुनिल पाटील,कैलास महाराज, विनोद आप्पा सरपंच शिवाजी तावडे सुभाष अण्णा, पञकार प्रा.यशवंत पवार, युवराज काळे, डि.के.पाटील सह परीसरातील सर्व शिवसेना व युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूञसंचालन पकंज बाविस्करसर तर पदमबापु यांनी सर्वांचे आभार मानले तर बैठकिचे सर्व नियोजन अजयकुमार जैस्वाल सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील गोपाल विठ्ठल पाटील नितीन पाटील अमिनदादा शेख उमेश चौधरी यांनी केले होते.