एस.टी. महामंडळ अधिकार्‍यांच्या वाहनांवरील शासनाचा लोगो काढण्यासाठी कर्मचार्‍यांचा एल्गार

एस.टी. महामंडळ अधिकार्‍यांच्या वाहनांवरील शासनाचा लोगो काढण्यासाठी कर्मचार्‍यांचा एल्गार
एसटी महामंडळ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

एस.टी महामंडळ (ST Corporation) असतांना एस.टी.च्या अधिकार्‍यांच्या वाहनावर (officer's vehicle) महाराष्ट्र शासनाचा लोगो (Government of Maharashtra logo) कसा ? असा सवाल उपस्थित करत जळगाव आगारातील संपकरी एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले. याबाबत संपकरी कर्मचार्‍यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (Sub-Regional Transport Officer) व जिल्हाधिकारी (Collector) यांना निवेदन दिले आहे. जळगाव आगारात कर्मचार्‍यांनी (employees) घोषणाबाजी केली.

एस.टी. विभागाला शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी एस.टी. कर्मचार्‍यांचा गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून बेमुदत संप सुरु आहे. एस.टी. विभाग हा महामंडळात आहे, असे असतांना एस.टी.चे विभाग नियंत्रक व इतर अधिकार्‍यांच्या वाहनांवर महाराष्ट्र शासनाचा लोगो आहे, शासकीय कर्मचारी नसतानाही वाहनावर महाराष्ट्र शासन असे लिहून टोल चुकविण्यासह संबंधित अधिकारी दुरुपयोग करत असून सरकारची दिशाभूल करताहेत असा आरोपही संपकरी कर्मचार्‍यांनी केलाय.

संपकरी कर्मचार्‍यांनी विभाग नियंत्रक आणि इतर अधिकार्‍यांच्या वाहनांचे क्रमांकासहित वाहनांबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. दुसरीकडे शिवशाही बसवरील राज्य परिवहन महामंडळाचा लोगो अनधिकृत असल्याने तो सुद्धा काढण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com