खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे - डॉ.निर्मल टाटीया

खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे - डॉ.निर्मल टाटीया

चोपडा - प्रतिनिधी chopada

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संस्था (Mahatma Gandhi Institute of Education) व कला, शास्र आणि वाणिज्य महाविद्यालयातने (College) शैक्षणिक विकासात क्रीडा (sports) क्षेत्राने अग्रेसर भूमिका बजावली आहे.अशा शब्दात संस्था आणि महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचे कौतुक करून, नियमित व्यायाम व समतोल आहार यातून खेळाडूंचे उत्तम भरण पोषण होण्यास मदत होते. तसेच खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे असे प्रतिपादन प्रेरणा दर्पण फाऊंडेशनचे (Prerna Darpan Foundation) अध्यक्ष डॉ.निर्मल टाटीया (Dr. Nirmal Tatia) यांनी केले.

खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे - डॉ.निर्मल टाटीया
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री
खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे - डॉ.निर्मल टाटीया
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळ मंडळाचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhary) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (North Maharashtra University) व एरंडोल क्रीडा समिती मारवड द्वारा कै.नानाभाऊ म.तु.पाटील कला महाविद्यालय, मारवड व महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुष व महिला गटासाठी दि.१० व ११ नोव्हेंबर २०२२ रोजी आंतर महाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे - डॉ.निर्मल टाटीया
Video गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे
खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे - डॉ.निर्मल टाटीया
Video गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे

स्पर्धांचे उदघाटन क्रीडा ज्योत पेटवून व ध्वजारोहण करून निर्मल टाटीया यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी सौ.सपना टाटीया, अस्थिरोगतज्ञ डॉ.दुर्गेश जयस्वाल,बालरोग तज्ञ डॉ.नीता जयस्वाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळ मंडळाचे अध्यक्ष अड.संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील,मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले,एरंडोल विभाग क्रीडा समितीचे सचिव डॉ.देवदत्त पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी,उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, सौ.एम.टी.शिंदे तसेच विविध तालुक्यातून आलेले क्रीडा संचालक उपस्थित होते.याप्रसंगी विद्यापीठ खेळाडूंच्याद्वारे क्रीडा ज्योतीचे आगमन झाले.यावेळी सहभागी खेळाडूंना शपथ देण्यात आली.

खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे - डॉ.निर्मल टाटीया
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

यावेळी मारवड येथील प्राचार्य डॉ.वसंत देसले म्हणाले की,महाविद्यालयीन परिक्षेत्रांतील सर्वात मोठी स्पर्धा असून,ग्रामीण भागातील खेळाडूंना मैदानी स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले ही महत्वपूर्ण बाब आहे.याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अड.संदीप पाटील यांचे तसेच महाविद्यालयाचे कौतुक केले.स्पर्धेत अमळनेर, जळगाव, एरंडोल, धरणगाव, चोपडा परिसरातील महाविद्यालयीन खेळाडू मोठया संख्येने सहभागी झाले होते.

खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे - डॉ.निर्मल टाटीया
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

प्रास्ताविक व सुत्रसंचलन व आभार क्रीडा संचालक सौ.के.एस.क्षीरसागर यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी स्पर्धेचे समन्वयक डॉ.एस.आर. पाटील,क्रीडा संचालक सौ.क्षीरसागर व जिमखाना समिती सदस्य यांनी मेहनत घेतली.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डी.पी.सपकाळे, डॉ.एम.एल.भुसारे, डॉ.एल.बी.पटले, डी.एस.पाटील, डॉ.आर.आर. पाटील, एम.बी.पाटील, ए.एच.साळुंखे, वाय.एन.पाटील, ए.ए. पाटील, डॉ.पी.एन.सौदागर, एम.बी.पावरा, व्ही.एन.सूर्यवंशी जी.बी.बडगुजर, बी.एच.देवरे, राजू निकम, रवींद्र पाटील, सुधाकर बाविस्कर, राकेश काविरे, योगेश निकम, डी.एस. राठोड यांनी परिश्रम घेतले.

खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे - डॉ.निर्मल टाटीया
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com