
भुसावळ - Bhusaval
आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) निमित्त १० रोजी पंढरपुर (Pandharpur) येथे आयोजित कार्यक्रमात दाखल होणार्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात (Growing crowd of devotees) घेता मध्य रेल्वेने (Central Railway) नागपूर ते पंढरपुर (Nagpur to Pandharpur) दरम्यान ६ ते १२ जुलै दरम्यान विशेष आठ गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर मिरज नागपूर विशेष एक्सप्रेस- गाडी क्र. ०१११५ नागपूर मिरज नागपूर स्पेशल ही गाडी ६ व ९ जुलै रोजी नागपूर येथून सकाळी ८.५० वाजता रवाना होऊन भुसावळ येथे दुपारी ४.१० वाजता तर दुसर्या दिवशी पहाटे ८ वाजता पंढरपुर पोहचेल.
परती दरम्यान, ९ व ११ जुलै रोजी गाडी क्र. ०१११६ दुपारी ३.५५ वाजता पंढरपुर येथून रवाना होऊन दुसर्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता भुसावळ तर दुपारी १२.२५ वाजता नागपूर पोहचेल.
नागपूर -पंढरपूर स्पेशल - गाडी क्र. ०१११७७ - दि. ७ व १० जुुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूर येथून रवाना होऊन दुपारी ४.१० वाजता भुसावळ तर सकाळी ८ वाजता पंढरपूर पोहचेल.
परती दरम्यान, ८ व ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता भुसावळ तर दुपारी १२.२५ वाजता नागपूर पोहचेल.
न्यू अमरावती -पंढरपूर स्पेशल - गाडी क्र, ०१११९ ही दि. ६ व ९ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता न्यू अमरावती येथून रवाना होऊन सायंकाळी ७.१० वाजता भुसावळ तर दुसर्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपुर पोहचेल. परती दरम्यान, दि. ७ व १० जुलै रोजी सायं. ७.१० वाजता पंढरपुर येथून रवाना होऊन दुसर्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता भुसावळ तर दुपारी १२.४० वाजात न्यु अमरावती पोहचेल.
खामगाव -पंढरपूर स्पेशल - गाडी क्र. ०११२१ दि. ७ व १० जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता खामगाव येथून रवाना होऊन दुपारी १.२५ वाजता भुसावळ तर दुसर्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपुर पोहचेल.
परती दरम्यान, ८ व ११ जुलै रोजी पहाटे ५ वाजता पंढरपुर येथून रवाना होऊन साय. ५.१५ वाजता भुसावळ तर रात्री ७.३० वाजता खामगाव पोहचेल.
प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे अवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.