भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी हजूर साहिब नांदेड ते श्री गंगानगर व हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यात हजूर साहिब नांदेड आणि श्री गंगानगर विशेष- गाडी क्र. ०७६२३ अप विशेष हजूर साहिब नांदेड येथून १ एप्रिल पासून दर गुरुवारी पहाटे ६.५० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सायंकाळी सायं ७.२० वाजता श्री गंगानगरला पोहोचेल.

०७६२४ डाऊन विशेष श्री गंगानगर येथून ३एप्रिलपासून दर शनिवार रोजी दुपारी १२.३० वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी पहाटे २.३० वाजता हजूर साहिब नांदेडला पोहोचेल.

ही गाडी अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगांव, अमळनेर, नंदुरबार, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, नाडियाद, अहमदाबाद, महेसाना, पालनपूर, आबू रोड, पिंडवारा, फालना, मारवार, पालीमारवार, जोधपूर, मेरता रोड, नागौर, नोखा, बिकानेर, सुरतगढ, रायसिंग नगर, श्रीकरणपूर या स्थानकांवर थांबेल. या गाडीला १ वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, १ वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ९ स्लिपर आणि २ द्वितीय श्रेणी आसन.डबे असतील.

हजूर साहिब नांदेड आणि हजरत निजामुद्दीन विशेष - ०२७५३ डाऊन विशेष हजूर साहिब नांदेड येथून ६ एप्रिल पासून दर मंगळवारी सकाळी ९.०० वाजता सुटेल आणि दुसर्या सकाळी १०.३० वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.

०२७५४ अप विशेष हजरत निजामुद्दीन येथून ७ एप्रिल पासून दर बुधवारी २२.४० वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी पहाटे १२.३५ वाजता हजूर साहिब नांदेडला पोहोचेल.

ही गाडी परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, जळगांव, भोपाळ, झांसी, आग्रा कँट स्थानकांवर थांबेल. या गाडीला २ वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, २ वातानुकुलीत तृतीय श्रेणी, १० शयनयान आणि २ द्वितीय श्रेणी आसन.

डबे असतील. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.