आरआरबी परीक्षेसाठी नागपूर, सिकंदराबाद दरम्यान विशेष गाडी

परीक्षार्थींसाठी मध्य रेल्वेची सुविधा : गर्दी कमी करण्याचा प्रयत्न
आरआरबी परीक्षेसाठी नागपूर, सिकंदराबाद दरम्यान विशेष गाडी

भुसावळ (bhusawal) प्रतिनिधी

मध्य रेल्वेने (central railway) आरआरबी परीक्षेच्या (RRB Exam) परीक्षार्थिंची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नागपूर (Nagpur) आणि सिकंदराबाद (Sikandarabad) दरम्यान आरआरबी परीक्षा विशेष गाडी (Special train) चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
यात गाडी क्र. ०१२०३ विशेष गाडी दि. ७ मे रोजी नागपूर येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि सिकंदराबाद येथे दुसर्‍या दिवशी ९.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२०४ विशेष गाडी दि. ९ रोजी सिकंदराबाद येथून रात्री २०.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे तिसर्‍या दिवशी पहाटे ५ वाजता पोहोचेल.

आरआरबी परीक्षेसाठी नागपूर, सिकंदराबाद दरम्यान विशेष गाडी
अखेर 'तुकडाबंदी'चे परिपत्रक खंडपीठात रद्दबातल
आरआरबी परीक्षेसाठी नागपूर, सिकंदराबाद दरम्यान विशेष गाडी
आनंद वार्ता ; शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची ४० कोटी रक्कम एनपीएस खात्यात जमा

ही गाडी मार्गात वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ (Bhusawal) , जळगाव (Jalgaon) , मनमाड (Manmad) , नाशिक रोड (Nasik Road), कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलाबुर्गी, वाडी, विकाराबाद, लिंगमपल्ली. स्थानकांवर थांबेल, या गाडीला ९ स्लिपर, ४ जनरल, एक जनरेटर व्हॅन असे डबे असतील. या गाडीचे आरक्षण सुरु करण्यात आले आहे. प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याची विनंती करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.