मतदार नोंदणी व पुर्नरीक्षणासाठी विशेष मोहिम

दावे, हरकती स्विकारण्यात येणार
मतदार नोंदणी व पुर्नरीक्षणासाठी विशेष मोहिम

चाळीसगाव chalisgaon/ प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील मतदारासाठी मतदार यादीचा (Voter list) विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, दावे व हरकती स्विकारण्याच्या कालवधीत मतदार नोंदणीसंदर्भात (Voter registration) विशेष मोहिमांचा कालवधी निश्‍चित करण्यात आल्याची माहिती चाळीसगावचे प्रातांधिकारी लक्ष्मीकांत साताळकर (Pratandhikari Laxmikant Satalkar) यांनी पत्रपरिषदेत दिली.

चाळीसगाव तहसील कार्यालयात मंगळवारी पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रातांधिकारी लक्ष्मीकांत सातळकर, तहसीलदार अमोल मोरे आदि उपस्थित होते. यावेळी माहिती देतांना प्रातांधिकारी यांनी दि,१ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यात मतदाराचे दावे, हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे.

यात दि,१ नोव्हेंबर रोज एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दि, १ ते ३० नोव्हेंबर या कालावंंधीत दावे व हरकती स्विकारण्याचा येतील. दि.१३, १४, २७, २८ नोव्हेंबर विशेष मोहिम, दि,२० रोजी दावे व हरकती निकालात काढणे.

दि,५ जानेवारी मतदार अंतिम यादी प्रसिध्दीकरण्यात येणार आहे. यासंपूर्ण प्रक्रियेसाठी आपल्या-आपल्या भागातील बीएलवो मतदारास मदत करतील. तसेच मतदार ऑनलाईन पोर्टलवर व ऍपव्दारे सुध्दा मतदार आपले नाव नोंदवू शकतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com