पुत्र वियोगाचा, शोक अनावर झाला, मातेनेही आपुला, प्राण मग त्यागला.!

धरणगावात मुलापाठोपाठ २४ तासात आईचाही मृत्यू :
पुत्र वियोगाचा, शोक अनावर झाला,
मातेनेही आपुला, प्राण मग त्यागला.!

धरणगाव Dharangaon (प्रतिनिधी) :

आई खरंच काय असते,

लेकराची माय असते,

वासरायची गाय असते.

लंगड्याचा पाय असते.

ही कविता आईची महती सांगायला पुरेशी आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.! (Swami is the mother of the three worlds without a beggar) ही म्हण जशी प्रचलीत आहे. तशीच, साऱ्या जगाची चिंता, एक आई वाही. आई सारखी माया, तिन्ही लोकात नाही. या सुवचनांची प्रचिती धरणगावात आली. शुक्रवारी पहाटे ५ वाजता येथील विनोद भागचंद चौधरी (४०) या तरुणाचं (youth) हृदयविकाराच्या (Heart attack) धक्क्याने दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. या घटनेची त्याची वयोवृद्ध आई (Elderly mother) सौ.शांताबाई भागचंद चौधरी (८२) यांना इतका बसला, की शोक करत करत त्यांनीही आपली इहलोकाची यात्रा संपवून टाकली. लाडक्या लेकाच्या पाठोपाठ आईनेही या जगाचा निरोप (Goodbye to the world) घेतल्याने धरणगावात शोककळा पसरली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की येथील भागचंद भगा चौधरी यांचा कनिष्ठ सुपुत्र तथा बालाजी टेंट हाऊसचा संचालक (Director of Balaji Tent House) विनोद (आबा) भागचंद चौधरी याचे शुक्रवारी पहाटे दुर्दैवी निधन (Died) झाले. आबाला चार भाऊ असून, तो सर्वात लहान होता. त्याचा टेंट हाऊसचा उद्योग, तालुक्यात प्रसिद्ध आहे. कामाला ढाण्या वाघ असलेला आबा, वागण्या, बोलण्यात अतिशय विनम्र होता. त्याच्या लग्नासाठी स्थळ बघत असतांनाच, काळाने त्याच्यावर झडप घातली.

या प्रसंगाने घरावर शोककळा पसरली. आबा आईचा लाडका असल्याने आणि त्याला नवरदेव बनलेलं बघण्याचं स्वप्नं पाहणारी आई (mother), या धक्क्याने कोलमडून पडली. तिचा शोक अनावर झाला. २४ तासातच त्यांनाही हृदयविकाराचा (Heart attack) धक्का बसला आणि त्या मुलाच्या मागे, त्याला सोबत करायला निघून गेल्या. मातेच्या प्रेमाची आणि आईच्या मायेची, त्यांनी पुनरावृत्ती केल्याची चर्चा परीसरात होत आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आबाचे बंधू हेमंत भागचंद चौधरी आणि वहिनी सौ. भारती चौधरी हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. या दुःखद घटनेमुळे शनिवारी सायंकाळी "शिवसंपर्क" अभियानाचे "शिवनेरी" या शिवसेना कार्यालय कोट बाजार येथे होणारे मुख्यमंत्र्यांच्या सभेचे थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार होता. मात्र, परिवारीक दुःखात सामिल होत शिवसेनेने संवेदनशीलतेचेच दर्शन घडविले आहे.

Related Stories

No stories found.