कार्यक्षमता वाढीसाठी सॉफ्ट स्क्लिल्स आवश्यक : कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी

कार्यक्षमता वाढीसाठी सॉफ्ट स्क्लिल्स आवश्यक : कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी

जळगाव jalgaon (प्रतिनिधी)

‘ स्व ’ ची ओळख, संघ भावना (Team spirit) आणि आपल्यातील कार्यक्षमता वाढीसाठी (increase efficiency) सॉफ्ट स्क्लिल्स (Soft Skills) आवश्यक असून विद्यापीठातील अधिकारी – कर्मचारी यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षणाचा (training) निश्चितच कार्यालयीन कामासाठी फायदा होईल असे प्रतिपादन कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी (Vice Chancellor Prof. VL Maheshwari) यांनी केले.

Vice Chancellor Dr. V.L. Maheshwari
Vice Chancellor Dr. V.L. Maheshwari

यशदा पुणे, (Yashada Pune) जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, पाल (District Administrative Training Institute, Pal) आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या करीता २७ जून ते १ जुलै या कालावधीत आयोजित सॉफ्ट स्कील डेव्हलपमेंट प्रशिक्षण (Soft Skill Development Training) वर्गाचा समारोप १ जुलै रोजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी मंचावर जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक वाय. एस. बहाळे, प्रभारी अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रशिक्षक रागीब अहमद, डॉ. रमेश सरदार हे होते.

प्रशिक्षण समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना प्रा. माहेश्वरी यांनी जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे आभार मानून अशा प्रशिक्षणामुळे कार्यालयीन कामात गतीमानता वाढीला मदत होते असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी व्यक्तिमत्व विकासाची अनेक उदाहरणे दिली. जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संसथेचे संचालक श्री. बहाळे यांनी सांगितले की, राज्य प्रशिक्षण धेारणांतर्गत हया प्रशिक्षण आयोजनाचा प्रस्ताव कुलगुरुंकडे सादर केल्यानंतर त्याचवेळी त्यांनी यास मंजुरी दिली.

निर्णय प्रक्रीयेतील ही गतीमानता उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त करुन विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशिक्षणाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन काही कालावधीनंतर नव्या विषयांसह प्रशिक्षण आयोजित करण्याचा प्रस्ताव सादर केला जाईल. प्रशिक्षक रागीब अहमद यांनी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणात उत्साही सहभाग दर्शविला असे सांगितले.

प्रा.डोंगरे आणि रमेश सरदार यांनी कुलगुरुंना प्रशिक्षण अहवाल सादर केला. यावेळी प्रशिक्षणार्थी तर्फे प्रभारी उपकुलसचिव केशव पाटील, इंजि. प्रमोद मराठे, श्रीमती सुरेखा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रमेश सरदार यांनी केले.

सूत्रसंचालन प्रवीण चंदनकर यांनी केले. या प्रशिक्षण आयोजनासाठी प्रशिक्षण संस्थेचे डॉ.ए.आर. लाडवंजारी, केदार बापूराव, धनराज कासार, डॉ.मिलींद धनराज, विद्यापीठ प्लेसमेंट ऑफीसर सोनाली दायमा, मीरा तायडे, सविता पगारे यांनी परीश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com