श्रामनेर शिबिरातून झाले सामाजिक सलोख्याचे दर्शन

चांगदेव गावाने निर्माण केला आदर्श
श्रामनेर शिबिरातून झाले सामाजिक सलोख्याचे दर्शन

मुक्ताईनगर Muktainagar

बुद्धम् शरणम् गच्छामि , धम्मम शरणम गच्छामि , संगम शरणम गच्छामि , सबका मंगल , सबका मंगल, सबका मंगल होय रे.. I अशाप्रकारे जयघोष करीत संपूर्ण विश्वात शांती सुख-समृद्धी (Peace, happiness and prosperity) नांदावी सर्वांचे कल्याण होवो मंगल होवो हा संदेश पोहोचविण्याचे काम तथागत भगवान बुद्धांच्या (Lord Buddha) मानवता प्रस्थापित करणाऱ्या धम्मातून श्रामनेर शिबिराच्या (Shramner camp) माध्यमाने पोहोचविला. या शिबिरात चांगदेव गावातील सर्व जाती-धर्माच्या ग्रामस्थांनी श्रामनेर शिबिरात सहभागी होऊन सामाजिक सलोख्याचे दर्शन (social harmony) झाले एकीकडे समाजात समाजात तेढ निर्माण करण्या चे प्रयत्न होत असताना चांगदेव गावात मात्र ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीने मानवतेचे दर्शन होऊन चांगदेव (Changdev) या गावाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव या संतांच्या भूमीत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (Buddhist Society of India) जिल्हा शाखा जळगाव पूर्व मुक्ताईनगर तालुका शाखे अंतर्गत चांगदेव ग्राम शाखेच्या विद्यमाने श्रामनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे (Shramner camp) आयोजन करण्यात आले होते सदर श्रामनेर संघाचे उपाध्याय म्हणून चैत्यभूमी दादर मुंबई येथील परमपूज्य भन्ते दीपंकर थेरो , प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ केंद्रीय शिक्षक मुंबई ए.जी.तायडे , कार्यक्रमाची धूपपूजा नाशिक विभागाचे सचिव के.वाय.सुरवाडे , पुष्पपूजा जिल्हाध्यक्ष जळगाव पूर्वचे बौद्धाचार्य शैलेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे (Buddhist Society of India) मुक्ताईनगर तालुका शाखा अध्यक्ष शरद बोदडे (Branch President Sharad Bodde) होते.

याप्रसंगी कार्यक्रमास संस्कार विभागाचे उपाध्यक्ष सुशीलकुमार हिवाळे, संरक्षण विभागाचे लेफ्टनंट कर्नल युवराज नरवाडे , मेजर रमेश सावळे , संस्कार विभागाचे सचिव भीमराव पवार , जिल्ह्याचे संघटक सुनील अढागळे, विश्वंभर अडकमोल , केंद्रीय शिक्षक प्रा.डॉ.संजीव साळवे , बौद्धाचार्य पुरुषोत्तम भारसाकळे , बौद्धाचार्य दिलीप पोहेकर , वंचित बहुजन आघाडीचे विश्वनाथ मोरे, अरुण रायपुरे , बौद्धाचार्य सारिपुत्त गाढे , डॉ.दिलीप पानपाटील, प्रा.डॉ.थोरात ,बौद्धाचार्य पी.डी.सपकाळे , एन.जी.शेजोळे अमोल वाघ सुरेश भालेराव , संजय पालवे ,तालुक्याचे सचिव चंद्रमणी इंगळे, कोषाध्यक्ष आर .वाय.सोनवणे , तालुका संघटक व्हि.डी.तायडे , सरपंच निखिल बोदडे उपसरपंच दत्तू चौधरी , पोलीस पाटील भूषण चौधरी , सर्व ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन राजेंद्र चौधरी सामाजिक कार्यकर्ते अतुल पाटील , शाहीर धुरंधर , प्रवीण सदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

दहा दिवसीय श्रामनेर बौद्धाचार्य शिबीरात (Shramaner Buddhist Camp) 33 जणांनी दीक्षा घेतली.या ठिकाणी दररोज सकाळी सात वाजता चांगदेव गावातून प्रत्येक गल्लीतून पवित्र संघाची (Holy Congregation) प्रभात फेरी (Morning round) बुद्धम् सरणम् गच्छामी धम्मम शरणम गच्छामि संगम शरणम गच्छामि सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा मंगलम जयघोषात सर्व जाती-धर्माचे लोक , संपूर्ण ग्रामस्थ प्रत्येक गल्लीत रांगोळी टाकून पुष्पवर्षाव करून भव्य स्वागत केले जात होते.

तसेच पवित्र संघाचे पूजन करण्यात आले. एवढेच नव्हे तर संघास सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. के .पाटील, मधुकर धनराम चौधरी, गणेश संजय चौधरी, विजय हरी कचरे, सूपडु तापीराम बोदडे, राजेश तायडे रत्नपाल, धुळे विशाल तायडे, राहुल बोदडे, तुषार ठाकरे, फकीरा बोदडे, यांच्यातर्फे नाश्ता देण्यात आला तर मेहून येथील युवराज इंगळे, मानेगाव येथील संदीप श्रीराम बगे , हरताळा, चिंचोल, , पिंपरीअक्काराऊत येथील समस्त बौद्ध मंडळ , चांगदेव येथील ग्रामपंचायत कमिटी वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील श्रावणधारा बुद्धविहार कमिटी अन्नपूर्णनगर दर्यापूर मानेगाव येथील राजेंद्र आत्माराम पाटील, सोनू पाटील यांच्यातर्फे पवित्र भिक्खू संघास भोजनदान तसेच चांगदेव येथील समस्त गावकरी मंडळातर्फे शेवटच्या दिवशी नगर भोजन देण्यात आले.

चांगदेव येथील युवराज बोदडे सुभाष बोदडे चांगदेव येथील एस. बी. चौधरी हायस्कूल चे चेअरमन राजेंद्र त्र्यंबक चौधरी, राहुल श्रीराम पाटील, जनार्धन बाबुराव बोदडे, चांगदेव येथील पोलीस पाटील भूषण विनोद चौधरी, माजी सरपंच पंकज कोळी, चांगदेव येथील मुकेश तायडे, मुक्ताईनगर येथील सुनील वानखेडे, हरताळ येथील शांताराम निकम, चांगदेव येथील शिवदास इंगळे, रावेर येथील वामन तायडे, गौरखेडा तालुका रावेर येथील सुरेश भालेराव, मेहून येथील सतीश गायकवाड, चांगदेव येथील संकेत केला ग्रुप पंजेकटर टीम यांच्यातर्फे पवित्र संघास फलाहार दान देण्यात आला. अशाप्रकारे संपूर्ण ग्रामस्थांनी तसेच तालुक्यातील संपूर्ण जाती-धर्माच्या बांधवांनी धम्मदान देऊन जातीय सलोख्याचे माणुसकीचे दर्शन (philosophy of humanity) घडवले आणि चांगदेव गावाने एक आदर्श निर्माण केला. हाच आदर्श देशातील प्रत्येक गावाने घेतल्यास राष्ट्रीय एकात्मता (National unity) वृद्धिंगत होईल अशा गावांचा गौरव आदर्श गाव म्हणून शासनातर्फे करण्यात यावा अशी अपेक्षा व प्रतिक्रियाही या शिबिराप्रसंगी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चांगदेव ग्रामशाखेचे युवराज बोदडे , मुरलीधर बोदडे , सुभाष बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष फकीरा बोदडे , सचिव मुकेश तायडे , कोषाध्यक्ष नीरज बोदडे , महेंद्र बोदडे , गुणवंत इंगळे , राहुल बोदडे , प्रीतम बोदडे , ईश्वर शिरसोदे, राजेश तायडे , विशाल तायडे , सिद्धार्थ आटकळे , रत्नपाल धुळधुळे , प्रतिक बोदडे , सचिन म्हसाने , लीलाधर चौधरी ग्रामपंचायत सदस्य नबी पिंजारी, महेश चौधरी, मधुकर महाराज, अतुल महाजन, विजय कोळी , विजय चौधरी पि.के .पाटील , एल.डी.पाटील , आर. एन .पाटील यांच्यासह सर्व समाज बांधव तसेच चांगदेव येथील सर्व गावकरी बांधव या सर्वांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संघटक जनार्धन बोदडे यांनी केले तर आभार युवराज बोदडे यांनी मानले.

Related Stories

No stories found.