‘संघ-शिरोमणी’ पदवीने सामाजिक कार्यकर्ते सुभाष ललवाणी सन्मानित!

‘संघ-शिरोमणी’ पदवीने सामाजिक कार्यकर्ते सुभाष ललवाणी सन्मानित!

भडगाव - प्रतिनिधी bhadgaon

मुळचे कजगाव ता.भडगाव येथील रहिवासी निगडी (पुणे) (pune) येथे वास्तव्यास असलेले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष ललवाणी यांना आकुर्डी-निगडी-प्राधिकरण संघाच्या विश्वस्त मंडळाने “संघ-शिरोमणी’’ या उपाधी ने सन्मानित केले.

आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री.संघाला निःस्वार्थ भावाने दिल्या गेलेल्या सेवेचा विश्वस्तांनी आदरपुर्ण उल्लेख करत सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा व सर्वांप्रति आदरभावाचा स्नेह भावाचा व सलोख्याचा गौरव केला व भावी काळातहि समाजोपयोगी सेवा निरंतर व्हावी ह्या भावना व्यक्त करत सुयश चिंतीले.

सत्काराला उत्तर देतांना सुभाष ललवाणी यांनी सांगितले की अनेक सामाजिक व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असतांना देखील स्वकियांनी दिलेला पुरस्कार मोठा आहे असा नम्रपणे उल्लेख करत पुरस्कार स्विकारला. या पुरस्काराने मला अजुनही जास्त काम करण्याची स्फूर्ति मिळेल असे मतही ललवाणींनी नोंदविले.

या समारंभास आकुर्डी निगडी प्राधिकरण श्री.संघाचे अध्यक्ष जवाहर मुथा, नि.व.अध्यक्ष व लोटस उद्योग समुहाचे संचालक संतोष कर्नावट, विश्वस्त व जेष्ठ नागरिक संघाचे प्रमुख सुर्यकांत मुथियान, संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र खिंवसरा, कोषाध्यक्ष नेनसुख मांडोत, महामंत्री मोतीलाल चोरडिया, मंत्री प्रकाश मुनोत, विश्वस्त धनराज छाजेड, राजेंन्द्र छाजेड, सचिन गांधी, अविनाश बोरा आदि मान्यवर उपस्थित होते. पुणेरी पगड़ी सन्मान पत्र शाल माळा आदि ने पदवी प्रदान करण्यात आली.

दरम्यान श्री समरथ जैन श्रावक संघाच्या वतिने व धोका प्रतिष्ठानच्या वतिनेही ललवाणी यांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश धोका, कार्याध्यक्ष महेशजी धोका, संघटक व सामाजिक कार्यकर्ते दिलीपजी चोरडीया यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रसंगी समरथ श्री संघाचे अनेक सन्माननीय सदस्य उपस्थित होते. प्रसंगी संघाच्या वतीने ललवाणी यांच्या अविरत समाज सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com