मग काय दोन नंबरचे धंदे आमच्या कार्यकर्त्यांचे आहेत काय?

कॉंग्रेसचा संतप्त सवाल , शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वादात आता काँग्रेसची उडी
मग काय दोन नंबरचे धंदे आमच्या कार्यकर्त्यांचे आहेत काय?

शरद बोदडे

मुक्ताईनगर Muktainagar (वार्ताहर) --

शिवसेना (Shiv Sena) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) एकमेकांवर अवैध व्यवसाय (Illegal business) करत असल्याचा आरोप (Allegations) करत आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुक्ताईनगर तालुक्याचे वातावरण ढवळून निघाले आहे.आता अवैध धंदे कुणाचे ? याची माहिती संपूर्ण मतदारसंघाला असतांना दोन्ही नेते मुद्दे सोडून गुद्यांचे राजकारण करत आहेत. जर दोन नंबरचे धंदे त्यांचे नसतील तर ते आमच्या कार्यकर्त्यांचे आहेत काय ?'' असा खडा सवाल आज कॉंग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील (Congress OBC Cell State Vice President Dr. Jagdish Patil) यांनी उपस्थित केला आहे.

यामुळे आता दोघांच्या वादात आता तिसऱ्याने उडी घेतल्याने मुक्ताईनगरचे तापलेले राजकीय वातावरण (Political atmosphere) अधिकच तापले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या सत्ताधारी असलेले महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना , काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही प्रमुख घटक आहेत.

मुक्ताईनगरात शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील दोन राजकीय घटक पक्षात धमासान सुरू आहे.असे असताना आज काँग्रेस पक्षाचे डॉ. जगदीश पाटील आणि कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राहूल पाटील यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्या दबावाच्या राजकारणावर जोरदार टीकास्त्र सोडले.

मुक्ताईनगर तालुक्यात व मतदार संघात अवैध धंदे नेमके कुणाचे ? अशा प्रश्नावर दोन राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सोडल्या जात असताना , जर ते अवैध धंदे त्यांची नसतील तर ते अवैध धंदे आमचे आहेत काय ? असा सवाल उपस्थित करून एक प्रकारे कबुलीच दिली असल्याची चर्चा असल्याने मुक्ताईनगर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रसंगी अनूसुचित विभागाचे तालुकाध्यक्ष निलेश भालेराव आणि ओबीसी तालुकाध्यक्ष निखील चौधरींची उपस्थिती होती.

आजवर शांत असलेल्या कॉंग्रेस नेत्यांनी सेना-राष्ट्रवादीच्या संघर्षात उडी घेतल्याने आता पुढे काय होणार ? याबाबत मात्र उत्सुकता निर्माण झाली आहे. अवैध धंद्यांना बाबत एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप त्यासोबतच जवळच असलेल्या बोदवड तालुक्यातील निवडणुकीसंदर्भात झालेला वाद यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे नाव तर राज्याचे लक्ष आता मुक्ताईनगर तालुक्याकडे व मतदारसंघाकडे लागून आहे.त्यामुळे आता हा वाद मिटणार की पेटणार ? हा वाद मिटविण्यासाठी संबंधित पक्षांचे वरिष्ठांकडून नेमकी आता काय भूमिका घेतली जाणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com