.. म्हणून जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री खडसेंचा मार्ग झाला मोकळा

.. म्हणून जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री खडसेंचा मार्ग  झाला मोकळा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (District Bank elections) माजी मंत्री एकनाथराव खडसे (Former Minister Eknathrao Khadse)यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात (High Court) नाना पाटील (Nana Patil)यांनी याचिका दाखल (Petition filed) केली होती. ही याचिका न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून (Rejected) लावली. त्यामुळे माजी मंत्री खडसेंचा बिनविरोध (Unopposed) होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर सोसायटी मतदार संघातून अर्ज दाखल केला. त्यांच्या विरुद्ध त्यांचे प्रतिस्पर्धी नाना पाटील यांनी अर्ज केला. परंतु नाना पाटील यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी त्यांचा अर्ज अवैध केला.

त्यावर नाना पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. मात्र विभागीय आयुक्तांने ते रद्द केले. शेवटी नाना पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु उच्च न्यायालयाने ती शुक्रवार कामकाज झाले असून न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आहे.

यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथराव खडसे यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीचे चार उमेदवार बिनविरोध झाल्याने बँकेवर त्यांचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com