जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

मनपाच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना मनपा प्रशासनाने यापुर्वी थकीत भाडे भरण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत. दोन दिवसांपुर्वी उपायुक्त प्रशांत पाटील यांनी बी.जे.मार्केटमध्ये जावून गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याची सूचना दिली.

लवकरात लवकर भाडे न भरल्यास गाळे सील करण्याचा इशारा दिल्यामुळे गाळेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमिवर महापालिका मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मनपा प्रशासनाने थकीत भाडे भरण्यास सक्ती केल्यास कोरोना काळातही गाळेधारकांच्या कुटूंबियांसह रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.

शहरातल शाहू मार्केटमध्ये गाळेधारक संघटनेची बैठक झाली. यावेळी राजस कोतवाल, संजय पाटील, तेजस देपुरा, पंकज मोमाया, वसिम काझी, युवराज वाघ, सुरेश पाटील, विलास सांगोरे, राजेश समदाणी, रमेश तलरेजा, गिरीष अग्रवाल, ऋषि साळुंखे, शिरीष थोरात, अमोल वाणी, मनिष बारी, प्रकाश गगडाणी, सुजीत किनगे, अमित गौड, सुनिल रोकडे यांच्यासह नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, बंडूदादा काळे उपस्थित होते.

गाळेधारकांमध्ये संताप

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करुन मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. तरीदेखील महापालिकेच्या माध्यमातून थकबाकी भरण्यासाठी गाळेधारकांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे गाळेधारकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व व्यापार, व्यवसाय ठप्प असतांनाही प्रशासनाकडून थकबाकीसाठी वारंवार तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना काळातही मनपा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय गाळेधारकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

हिताचा निर्णय घ्यावा

महापालिकेत गाळे नूतणीकरण व लिलाव करण्याचा प्रयत्न होत आहे. ही फार मोठी खेदाची बाब आहे. अशी खंत डॉ. शांताराम सोनवणे यांनी व्यक्त केली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी गाळेधारकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून निर्णय घ्यावा अशी मागणी डॉ.सोनवणे यांनी यावेळी केली.

लोकप्रतिनिधी म्हणतात, आम्ही गाळेधारकांसोबत

राज्यभरातील 27 महापालिका यांचा जोपर्यंत निर्णय लागत नाही. तोपर्यंत गाळेधारकांवर होत असलेल्या कारवाईस विरोध करावा. अशी सूचना डॉ.सोनवणे यांनी मांडली. यावर नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, बंडूदादा काळे तसेच आमदार राजूमामा भोळे यांनी दूरध्वनीवरुन आम्ही गाळेधारकांसोबत आहोत, असे आश्वासन दिले.