.. म्हणून कंडारीच्या विवाहितेने केली आत्महत्या

.. म्हणून कंडारीच्या विवाहितेने केली आत्महत्या

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

तालुक्यातील कंडारी (Kandari) येथील विवाहितेने जुळ्या मुुलींना जन्म (Married twins) दिल्याच्या कारणावरुन पती व सासूकडून होत असलेल्या छळास कंटाळून (Tired of persecution) विवाहिनेने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना 3 रोजी पहाटे घडली. याबाबत शहर पोलिसात (city police) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल (Crime against both) करण्यात आला आहे.

शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कंडारी येथील सुभाष नगरातील रहिवासी विवाहिता मनीषा गौरव तायडे (वय 26) यांनी 23 डिसेंबर रोजी जुळ्या मुलींना जन्म दिल्याच्या कारणावरुन सासू पुष्पा भिमराव तायडे व पती गौरव भिमराव तायडे यांनी मुलगा पाहिजे होता. या कारणाववरुन मानसीक व शारीरिक त्रास देऊन मनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुये तीने 3 रोजी पहाटे विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली.

याबाबत विवाहितेचे वडील, सुनील पोपट तायडे (वय 53, महादेव टेकळी कंडारी) यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात गु.र.नं. 1/22, भा.दं.वि. 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे सासू पुष्पा तायडे व पती गौरव तायडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com