स्मृती इराणींच्या फोटोला मारले जोडे; राज्यपालाच्या वक्तव्याचा निषेध

स्मृती इराणींच्या फोटोला मारले जोडे; राज्यपालाच्या वक्तव्याचा निषेध

जळगाव jalgaon।

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबाबत (Mumbai) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी वादग्रस्त विधान (Controversial statement) केले. या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे (Nationalist Congress Mahanagar) निषेध व्यक्त करून राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे युवक काँग्रेस पक्षातर्फे (Youth Congress Party) खा. सोनिया गांधी यांच्याशी गैरवर्तणूक केली म्हणून भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (BJP Union Minister Smriti Irani) यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन (agitation) करण्यात आले.

संसदेमध्ये भाजपाचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष खासदार सोनिया गांधी यांच्यासोबत गैरवर्तणूक केली. या गैरवर्तणुकीच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी जिल्हाध्यक्ष देवेन्द्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन समोर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रतिमेस युवक काँग्रेसच्या महिलांनी जोडे मारून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा जाहीर निषेध व्यक्त केला.

इराणींच्या या कृत्यामुळे संबंध भारत देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मन दुखावले गेले. या आंदोलनाप्रसंगी उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी प्रशांत उगले, जळगाव शहराचे प्रभारी राहुल माणिक, जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहराध्यक्ष मुजिब पटेल, मोसिन बागवान, मुरली सपकाळे, मकसूद पटेल, अरुणा पाटील, नीला तायडे, रश्मी ताळे, निलेश कोळी, इमरान शेख, दीपक पाटील, सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल कोश्यारींचा निषेध

मुंबईतून राजस्थानी व गुजराथी लोक जर बाहेर पडले तर मुंबई हि आर्थिक राजधानी राहणार नाहि असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात केले. या वक्तव्यामुळे राज्यातील जनतेचा अपमान झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महानगरतर्फे राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत आकाशवाणी चौक येथे रस्ता अडवून आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रात नविन राज्यपालांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, राजू मोरे, रिकू चौधरी, अमोल कोल्हे, सुशील शिंदे, अशोक सोनवणे, उज्वल पाटिल, भगवान सोनवणे, रमेश बहारे, दत्तात्रय सोनवणे, रहीम तडवी, विशाल देशमुख, इब्राहिम तडवी, किरण राजपूत, अनिल पवार, संजय जाधव, राहुल टोके, किरण चव्हाण, सूर्यकांत भामरे, हितेश जावळे, भला तडवी, भिमराव सोनवणे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com