भावी पोलिसांची स्मार्ट कॉफी : दोघांना जेलची हवा

पोलीस भरतीच्या परीक्षेत मोबाईलसह ब्लुटूथ वापरणे भोवले
भावी पोलिसांची स्मार्ट कॉफी : दोघांना जेलची हवा

जळगाव : पोलीस भरतीतील (police)लेखी परीक्षेत बांभोरी येथील नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सीटी महाविद्यालयात मोबाईलचा वापर करणार्‍या योगेश रामदास आव्हाड (रा.पांझनदेव, पो.नागापूर, ता.नांदगाव, जि.नाशिक) याला शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. रविवार, १० ऑक्टोंबर रोजी पाळधी पोलिसांनी योगेश आव्हाड यास व्हॉटसपवर उत्तरे पाठविणारा सागर अशोक कांगणे (रा.गोंदेगाव, ता.निफाड, जि.नाशिक) (nashik)याला पोलिसांनी (police)अटक केली.

भावी पोलिसांची स्मार्ट कॉफी : दोघांना जेलची हवा
Photo नाशिकमध्ये मुसळधार, रस्ते पाण्यात

दरम्या संशयित योगेश आव्हाडसह तालुका पोलिसात गुन्हा दाखल असलेला संशयित प्रतापसिंग गुलचंद बालोद (वय २४,रा.रांजनपुरवाडी,ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणार्‍या दोघा तरुणांना परीक्षेत गैरप्रकार करणे चांगलेच भोवले असून जेलची हवा खाण्याची वेळ आली आहे.

Related Stories

No stories found.