
चाळीसगांव chalisgaon । प्रतिनिधी
तालुक्यातील हातगांव शिवारातील (Hatgaon Shivara) एका शेतकर्यांचा सहा क्विवंटल (Six quintals cotton) कापूस अज्ञात चोरट्याने चोरून (stolen) नेला आहे. ही घटना दि,३० रोजी घडली असून या प्रकरणी चाळीसगाव पोलीस (police) स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की. फिर्यादी मच्छिंद्र गोविदं सांगळे यांच्या शेतात कापुस वेचनीचे काम केले होते. वेचलेला कापुस अंदाजे वजन करून जवळपास 24 क्विंटल कापूस हा शेतातील पत्री शेड मध्ये जमा करुन ठेवुन कापसास ताडपत्रीने झाकुन पत्री शेडच्या दरवाजाला कडी लावली होती.
दि. 29/11/2022 रोजी हातगांव गांवात मोती मातेची यात्रा उत्सव असल्याने श्री सांगळे हे परिवारासह सायंकाळी 07.00 वाजेच्या सुमारास हातगांव गावात यात्रा पाहण्यासाठी जात असतांना, पत्री शेडच्या दरवाजाला घाईगर्दीत कडी लावुन गेले. त्या नंतर दि. 30/11/2022 रोजी रात्री यात्रा व तमाशा पाहुन झाल्यावर ते शेतातील पत्री शेड मध्ये कापुस भरलेला असल्या कारणाने रात्री 01.00 वाजेच्या सुमारास शेतात गेलो असता, पत्री शेडचा लोखंडी दरवाजा उघडा दिसल्याने त्यांना शंका आली, त्यानी आत मध्ये जावुन बघीतले असता, वेचनी करून ठेवलेला अंदाजे 24 क्विंटल कापसापैकी जवळपास 06 क्विंटल कापूस हा तेथील पत्री शेड मधुन चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात छोट्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.