
पाचोरा Pachora । प्रतिनिधी-
येथील रेल्वेस्थानक आवारात (railway premises) 13 तोळे वजनाचे 6 लाख 6 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (Gold jewelry )एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये रेल्वेच्या (railways) महिला स्वच्छता कर्मचार्यांस (women cleaning staff) सापडले.
रेल्वे पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, दि. 16 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रेल्वे कंत्राटी सफाई कामगार (Sweepers) उषा गायकवाड या कचरा टाकण्यासाठी पीजे लोकोशेडच्या मागील बाजूस गेल्या होत्या. कचरा टाकून परतत असतांना त्यांना तेथे हिरव्या रंगाची कॅरीबॅग गाठ बांधलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी ती उचलून पहिली असता त्यात काही तरी सोनेरी वस्तू (golden thing) असल्याचे लक्षात आल्याने उषा गायकवाड यांनी सहकारी महिला सफाई कामगारांसोबत रेल्वे फलाटावरील लोहमार्ग दूरक्षेत्र पोलीस चौकीत आल्या. हवालदार ईश्वर बोरुडे यांचेकडे त्यांनी कॅरीबॅग सोपवली.
त्यात पिवळ्या धातूचे काही दागिने आढळल्यानंतर ते बेन्टेक्सचे असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. श्री. बोरुडे यांनी मात्र या प्रकरणाची नोंद घेऊन वरिष्ठांना कळवून सराफ असोसिएशनकडे (Saraf Association) दागिन्यांची तपासणी केली असता ते दागिने सोन्याचे ((golden) असल्याचे निदर्शनास आले. सुमारे 13 ग्रॅम वजनाचे सहा लाख 6 हजार रुपये किमतीचे दागिने त्यात मिळून आले.
त्यात एक सोन्याचा हार, चार बांगड्या, कानातील रिंग व साखळीचे टॉप्स, एक साखळी, एक पेंडल अशा स्वरूपाचे दागिने आहेत. दागिने रेल्वे पोलिसांकडून जप्त (Jewelry seized by railway police) करण्यात आले असून याप्रकरणी रात्री उशिरा नोंद करून दागिने चाळीसगाव रेल्वे पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले आहेत.
तपासासाठी पाचोरा शहर पोलिसांना लोहमार्ग पोलिसांकडून माहिती पाठविण्यात आली आहे. लोहमार्ग दूर क्षेत्र पोलिसांनी उषा गायकवाड यांचे जबाब नोंदवले आहेत. ईश्वर बोरुडे यांनी या प्रकरणी व्यक्तीचा काही दिवसात तपास लागू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.