सर आली धावून, रस्ता गेला वाहून

सत्यम नगरातील बिकट वाट, संतप्त नागरिकांची मनपात धाव; परिसरात तलावसदृश परिस्थिती
सर आली धावून, रस्ता गेला वाहून

जळगाव । प्रतिनिधी

दोन दिवसांपुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rain) कानळदा रोड, परिसरातील सत्यमनगर, गजानन नगरात रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था (Very poor road condition) झाली आहे. सर आली धावून रस्ता गेला वाहून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अक्षरशः नागरिकांना (Citizens) चिखलातून पायवाट (through the mud) काढावी लागत आहे. दरम्यान, या परिस्थितीमुळे परिसरातील संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेत (Municipal Corporation) धाव घेवून, आयुक्तांशी चर्चा केली आणि समस्यांचे निरसन करावे. यासाठी निवेदन दिले आहे.

कानळदा रोड सत्यमनगर, गजानन नगरात नवीन ले-आऊट करतांना रस्ता तयार केला गेला. रस्ता तयार करतांना केवळ माती टाकली गेली. त्यामुळे पहिल्या पावसातच तयार करण्यात आलेला रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. या परिसरात राहणार्‍या नागरिकांना जाणे-येणे देखील अशक्य झाले आहे.

परिसरात साचले पाणी

सत्यमनगर, गजानन नगरामध्ये गटारी नसल्यामुळे तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने पावसामुळे तलाव सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. घरासमोर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. कुठलीही सुविधा नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

आयुक्तांची घेतली भेट

नागरी सुविधा नसल्याने आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेत धाव घेवून आयुक्तांची भेट घेतली. तसेच अनेक नागरिकांनी त्यांच्या समस्यांचा पाढा वाचून दाखवला. प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.

तर मनपाने बांधकाम परवानगीदिलीच कशी?

कानळदा रोड परिसरात नवीन ले-आऊटमध्ये गटार, रस्ते नसतांनाही मनपा प्रशासनाने संबंधीतांना बांधकाम परवानगी दिलीच कशी? असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला. आमच्याकडून मालमत्ता कर वसूल केला जातो. त्या तुलनेने मनपाकडून कुठल्याही नागरी सुविधा मिळत नसल्याची नाराजी परिसरातील नागरिकांनी बोलून दाखविली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com