लोहारा शिवारात बिबट्याचे दर्शन ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

संग्रहीत चित्र
संग्रहीत चित्र

लोहारा ता.पाचोरा - वार्ताहर pachora

लोहारा येथे दि.१५ रोजी शनिवारी पहाटे ५ वाजता खाजगी वाहनाने शिरसाळा येथे हनुमान दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना लोहारा-जामनेर रस्त्यालगत संतोष जाधव (टेलर) यांच्या शेताजवळ (काळीशिवार) बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे काळी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी त्या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष हिरालाल जाधव हे त्यांच्या मित्रांसह शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनाला वाहनाने लोहारा-जामनेर रस्त्याने जात असतांना जलालशाह बाबा दर्ग्याच्या पुढे संतोष जाधव (टेलर) यांच्या शेताजवळील रस्त्यालगत वाहनाच्या लाईट मध्ये बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने त्यापरिसरात बिबटयचा मुक्तसंचार असल्याच्या खात्रीमुळे काळी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सध्या लोहारा व परिसरात कापूस वेचणीची कामे जोरात सुरू आहेत कापाशीचे पीक मोठीं मोठी आहेत समोर काय आहे हे दिसत नसल्यामुळे वनविभाने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com