खंडाळ्याचा शुभम ठरला ‘हनी ट्रॅप’चा बळी

फेसबुकवर झाली मैत्री, पैशांच्या सततच्या मागणीने जीव गमावला
खंडाळ्याचा शुभम ठरला ‘हनी ट्रॅप’चा बळी

भुसावळ । Bhusawal । प्रतिनिधी

तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी कुटुंबातील युवक शेतकर्‍याची मोबाईलच्या माध्यमातून फेसबुकवर एका तरुणीशी ओळख झाली. त्यातून अति घसट वाढल्याने या दोघांमध्ये काही छायाचित्रे, व्हिडिओंची देवाण घेवाण झाली. व त्यातूनच सदर तरुणीने या युवकास पैशांची सतत मागणी केली. काही प्रमाणावर त्याने पैसे दिले देखिल. ही मागणी वाढच गेली. या तरुणावर कर्ज घेण्याची वेळ आली व हा प्रकर घरी समजल्याने शेवटी समाजात बदनामी होईल या भितीने या तरुणाने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील खंडाळा या गावातील शेतकरी एकनाथ शालिक पाटील यांना दोन मुलं त्यात लहान मुलगा शुभम (लहानाभाऊ) पाटील (वय 20) आपले शिक्षण घेऊन वडिलांना शेतात व म्हशीच्या व्यवसायात मदत करायचा.

शुभमने काही दिवसांपूर्वी स्वतः कामाला जाऊन व त्यातून दोन पैसे शिल्लक टाकून अभ्यासासाठी अँड्रॉइड मोबाईल घेतला. त्यात त्याने ‘फेसबुक’ हे अ‍ॅप डाउनलोड करीत आपले खाते खोलले त्यात त्या मित्र परिवार वाढत गेल्याने त्याला कोणत्या तरी (फेक) नावाने मैत्रीणची फे्ंरड रिक्वेस्ट आली. ती स्विकारली हळूहळू फेसबुकची आवड निर्माण झाली. फेक खाते असल्याने शुभमची चॅटींग वाढले. या कथित मैत्रीणी सोबत मेसेंजर वर गप्पा गोष्टींमध्ये अश्लील बोलणे, अश्लील फोटो, अश्लील विडिओ शुभमला समोरच्या मैत्रीणीकडून येऊ लागले. त्यात शुभम हा नवतरुण मुलगा असल्याने ते यात गुरफटत गेला.

फेसबुकवरील मैत्रीणीने हळू हळू पुढे त्याचे संदेश, फोटो, तसेच विडिओ सेव्ह करून शुभम फसवत त्याला अनोळखी फोन नंबरवरुन शुभमला बर्‍याच दिवसांपासून कोणत्यातरी पुरुषांकडून पैशाची मागणी व धमकी येऊ लागले व ‘तुझे अश्लील फोटो विडिओ, व संदेश आमच्याकडे आहे. तू आम्हाला पैसे दे, नाही तर ते विडिओ आम्ही व्हायरल करून तुझी सोशल मीडियावर बदनामी करू’ असे धमकावण्यात येत असल्याने शुभमने घाबरून समोरच्या अज्ञात व्यक्तिला फोन-पे च्या माध्यमातून पैसे टाकत गेला.

मात्र सदरच्या व्यक्तीकडून पैशांची अधिकच मागणी वाढत गेली. त्यामुळे शुभम ला मानसिक त्रास जाणवू लागला. यानंतर त्याने आई, वडिल व मित्र परिवारासोबत हा विषय करणे योग्य नसल्याचे समजून उसने पैसे घेऊन सदर व्यक्तीला पैसे देत गेला. हा प्रकार वाढतच गेल्याने शुभम जास्तच त्रासला होता.

याबाबत आई वडिलांना समजल्यानंतर त्यांनी त्याची समजुत ही काढली होती. मात्र सततच्या धमक्या व पैशांची मागणी होत असल्याने आपली व आपल्या आईवडिलांची बदनामी होऊ नये म्हणून शुभम ने 8 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आईवडील खालच्या घरात झोपले असतांना वरच्या खोलीत जाउन दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 9 मार्च सकाळी 9 वाजता पंचनामा करून येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सकाळी 10 वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com