सुवर्णनगरीत आज श्रीराम रथोत्सव

सुवर्णनगरीत आज श्रीराम रथोत्सव

रथोत्सवाची तयारी पूर्ण; मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पूजन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव नगरीचे ग्रामदैवत (Village Goddess) व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेला श्रीराम मंदिर संस्थानाचा (Shriram Mandir Sansthan) श्रीराम रथोत्सव (Shriram Rathotsav) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आज निघणार आहे. रथोत्सवाची मंदिर संस्थानासह जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण (Preparations complete) झाली आहे. परंपेरनुसार मंदिर संस्थानाचे गादीपती मंगेश महाराज जोशी (Gadipati Mangesh Maharaj Joshi) यांच्या हस्ते मुख्य पूजा (main worship) होणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव नगरारीचा रथोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात होता. मात्र यंदा प्रशासनाकडून रथोत्सवाला परवानगी मिळाली असल्याने वेळेचे बंधन देखील घालून देण्यात आले आहे. सोमवारी दि. 15 रोजी साजरा होणार असून त्यापार्श्वभूमीवर शनिवारी रथाची साफसफाई करण्यात आली. त्यानंतर रविवारी दुपारी रथ भाविकांच्या मदतीने श्रीराम मंदिराच्या आवारात दालख करण्यात आला. त्यानंतर रथाच्या चाकाला तेलपाणी व त्याची दुरुस्ती करुन रथाची रंगरंगोटी सायंकाळपर्यंत पुर्ण करण्यात आली. त्यानंतर रात्रीपासून रथाची आकर्षक फुलांची सजावट करण्यास सुरुवात होणार आहे.

रथाला यंदा वेळेचे बंधन

रथोत्सवासाठी यंदा प्रशासनाकडून काही नियम घालून देण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत रथाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार रथोत्सव समितीकडून रथाचे नियोजन केले जात आहे. रथ पाहण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक दाखल होत असल्याने यंदा त्यानुसार प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.

रथोत्सवाला मान्यवरांची उपस्थिती

रथोत्साचे पुजन करण्यासाठी श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते होणार आहे. या पुजेला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जि. प. अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आयुक्त सतिश कुलकर्णी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, पिपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित रथाचे पूजन होणार आहे.

भवानीच्या सोंगाचे पूजन

रथोत्सवाला भवानी सोंग काढण्याची परंपरा आहे. दोन वर्षापासून रथोत्सव साधेपणाने साजरा होत असल्याने सोंग देखील काढले जात नव्हते. परंतू यंदा भवानी सोंग देखील निघाले असल्याने त्यांचे शहरातील भवानी मंदिरात विधीवत पुजन करुन दुपारनंतर भवानी सोंग काढण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com