श्री विठ्ठल मंदिरास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार

भूमिपूजनाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
श्री विठ्ठल मंदिरास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सकारात्मक संवाद (Positive communication) साधण्यासाठी सामाजिक सभागृहाचा (social hall) उपयोग व्हावा त्यादृष्टीने श्री. विठ्ठल मंदिरास (Vitthal temple) क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा (Category C Pilgrimage status) मिळवून देणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी दिली. भादली बु. येथे सामाजिक सभागुहाचे भूमिपूजन प्रसंगी ना.पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भरत बोरसे हे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ढोल ताश्यांच्या गजरात ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, दुध डेअरी, भजनी मंडळ व ग्रामस्थांनी शाल श्रीफळ देऊन जोरदार स्वागत केले. ना.गुलाबराव पाटील यांनी श्री विठ्ठल मंदिरात जावून दर्शन घेतले व सामाजिक सभागृहाचे पालकमंत्र्यांंच्याहस्ते विधिवत पूजा करून भूमिपूजन करण्यात आले. या सामाजिक सभागृहासाठी आमदार निधीतून 25 लक्ष निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सुरुवातीला भजनी मंडळ यांनी अभंग व भजन म्हणून सर्वाना मंत्रमुग्ध केले.

यावेळी तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, सरपंच प्रभाकर सोनवणे, उपसरपंच प्रवीण पाटील, ग्रा.पं.सदस्य समाधान पाटील, तुषार सोनवणे, जगदीश सोनवणे, नाना पाटील, सोसायटी चेअरमन भारत बोरसे, व्हा.चेअरमन युवराज पाटील, प्रभाकर पाटील, भूपेंद्र पाटील, दूध डेअरीचे विनोद पाटील, संजय पाटील, गोपाल पाटील, रामचंद्रबापू पाटील, जळगाव बाजार समितीचे उपसभापती सुरेश पाटील, संचालक अनिल भोळे, मच्छिंद्र पाटील, मुरलीधर पाटील, माजी सभापती पती जनार्दन पाटील, डॉ.कमलाकर पाटील, युवासेनेचे शिवराज पाटील, बालाशेठ लाठी, माजी पं.स.सदस्य बाळू अहिरे, भोकर व परिसरातील सरपंच हरीश पवार, पळसोदचे पंकज पाटील, जामोदचे मनोहर पाटील, आमोदाचे विकास सूर्यवंशी, फुपनीचे युवराज सपकाळे, नंदगावचे भूषण पवार, करंजचे शालिक पाटील, धानोराचे देवेंद्र पाटील, सावखेडाचे श्री. सपकाळे, सोसायटी चेअरमन जितेंद्र पाटील यांच्यासह भजनी मंडळ व परिसरातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले. तर आभार अमोल बोरसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी गावातील नागरिक यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

सामाजिक सभागृहाचे पालकमंत्र्याच्याहस्ते भूमिपूजन

भादली बु. येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी ना.पाटील म्हणाले की, भादली बु.आणि परिसरातील शेतकर्‍यांनी शिव रस्त्यांच्या विकासासाठी प्रस्ताव तयार करा. नंदगाव येथे 5 केव्हिएच्या ट्रान्सफार्मरची उभारणी करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. दरम्यान, सामाजिक सभागृहामध्ये ज्येष्ठ नागरिकांनादेखील बैठकीसाठी उत्तम प्रकारे सोयी देखील होणार आहे. सभागृहाचा सर्वांनाच फायदा होईल. त्या सभागृहाचे भूमिपूजन झाले असलेतरी लवकरच त्याच्या उभारणीसाठी सहाकार्य देखील केले जाईल. असेही त्यांनी आश्वासित केले. यावेळी नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसादत दिला

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com