श्रीरामांचे चरित्र समाजातील मर्यादा, संस्कार, संस्कृतीचे रक्षण करू शकते- आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज

श्रीरामांचे चरित्र समाजातील मर्यादा, संस्कार, संस्कृतीचे रक्षण करू शकते- आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज

मुक्ताईनगर (Muktainagar) : प्रतिनिधी

श्रीरामाचे चरित्रच (Shri Ram's character) समाजातील (society) मर्यादा संस्कार संस्कृतीचे रक्षण (values and culture) करू शकते म्हणून सर्वांनी श्रवण करावे आचरण करावे. असा महत्त्वपूर्ण उपदेश आचार्य अमृताश्रम स्वामी (Acharya Amritashram Swami Maharaj) यांनी दिला.

श्री संत आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त कोथळी येथे सनातन सतपंथ परिवारातर्फे आयोजित श्रीमद् भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताहाच्या पाचव्या दिवसाचे निरूपण करताना महाराजांनी सांगितले की, आदिशक्तीची अनेक स्वरूपे आहेत पण तिचे मूळ स्वरूप हे एकच आहे.

श्रीरामाचे चरित्रच समाजातील मर्यादा संस्कार संस्कृतीचे रक्षण करू शकते म्हणून सर्वांनी श्रवण करावे आचरण करावे. सीता स्वयंवराचे वर्णन करीत असताना त्यांनी सांगितले की, आजच्या वर्तमान स्थितीत लग्नसमारंभात संस्कृती परंपरेचा विपर्यास केला जातो हे दुर्भाग्य आहे अशी खंत त्यांनी आपल्या कथेतून व्यक्त केली.

श्रीमद्भागवत कथा श्रवण करण्यासाठी आज महानुभाव पंथाचे परमपूज्य सुरेशराज मानेकर बाबा शास्त्री आ. राजूमामा भोळे, ह भ प रविंद्र महाराज हरणे, ह भ प जीवन महाराज, ह भ प नितीन महाराज, ह.भ.प. कन्हैया महाराज, ह.भ.प. माधव महाराज धानोरा, हभप उद्धव महाराज, हभप मनोहर देव अंतूर्ली, श्री पंकज राणे उपसरपंच कोथळी यांच्यासह यांच्यासह दिगंबर महाराज संस्थान पंढरपुरचे नरेंद्र नारखेडे, जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजचे अध्यक्ष शरददादा महाजन, फैजपूर येथील माजी नगराध्यक्ष निलेश राणे, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजू वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते पंकज येवले, गजानन लोखंडे यांचा महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आदिशक्ती मुक्ताई ची प्रतिमा देऊन सत्कार केला. या भागवत कथेला पंचक्रोशीतील असंख्य भाविक धर्म मंडपात उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com