श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी...!

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी...!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, (Shri Krishna Govind Hare Murari...!) हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण्, पितु मात स्वामी, सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेवा, (O Nath Narayan Vasudeva)हे नाथ नारायण्, गो गो गोविंदाच्या गजरात शाळांमध्येही (schools) कृष्णजन्माष्टमी (Krishna Janmashtami) व गोपाळकाला (Gopalkala) जल्लोष रंगला (Cheers). लहान मुला-मुलींनी श्रीकृष्ण-राधेचा वेश परिधान करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.शिक्षकांसह मुलांनीही या उत्सवाचा आनंद लुटला.

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये कृष्णजन्माष्टमीनिमित्त समन्वयिका संगीता तळेले, स्वाती अहिरराव, अनघा सागडे यांच्या हस्ते पाळण्यातील बालकृष्णाचे पूजन करण्यात आले. पूर्णेश पाटील, हर्षिता बारी व एकता मुंदरा यांनी कृष्णजन्माष्टमीची माहिती व महत्व सांगितले.

इयत्ता चौथी,पाचवी,आठवी विद्यार्थिनींनी राधाकृष्णाच्या गाण्यांवर तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी गोविंदा आला रे आला रे आला या गीतावर नृत्य सादर केले. याशिवाय स्वरा पाटील,गौरी पिंपळे यांनीही बहरदार नृत्य सादर केले. दिव्यांशी पात्र, मेनू छाजेड व कल्पना सोनवणे यांनी गीत सादर केले.

शाळेचे विद्यार्थी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत आले होते. त्यानंतर समन्वयिका स्वाती अहिरराव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सूत्रसंचालन धनश्री पाटील या विद्यार्थिनीने केले.

शकुंतला विद्यालय

शकुंतला विद्यालयात कृष्णजन्माष्टमी व गोपाळकाला निमित्त श्रीकृष्ण पूजन व दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. विद्यार्थी राधा- कृष्ण वेशभूषेत आलेले होते. गर्भा खेळत विद्यार्थ्यांनी उत्साहात गोपाळकाल्याचा आनंद घेतला. याप्रसंगी मुख्याध्यापिका नेहा जंगले, आंतावसिता समनवयक संजय नन्नवरे, राहुल चौधरी, स्वाती जंगले, लक्ष्मी भालेराव, जयश्री झांबरे, जयश्री मिस्तरी यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

ब.गो.शानभाग विद्यालय

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय, सावखेडा येथे दहीहंडी गोपाळकाला उत्सवानिमित्त दांडिया, कृष्ण वेशभूषा आणि दहीहंडी सजविणे या स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक जगदीश चौधरी, उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे, दिनेश ठाकरे, शशिकांत पाटील, राजेंद्र पाटील, सुर्यकांत पाटील यांची उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांच्याहस्ते श्रीकृष्ण प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळ विभागात शिक्षक रंजना बाभूळके, संतोष जोशी, कविता कुरकुरे यांनी तर दुपार विभागात वरुण नेवे यांनी त्यांच्या सुरेल आवाजात कृष्णभक्तीवर आधारित गीत सादर केले. सकाळ सत्रात दांडिया स्पर्धेत इयत्ता 5वी ते 7वी च्या एकूण 153 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक अश्या देखण्या वेशभूषा परधान केल्या होत्या. स्पर्धेचे परीक्षक रुपाली पाटील, दीपिका चौधरी यांनी जबाबदारी सांभाळली.

दुपार विभागात झालेल्या कृष्ण वेशभूषा आणि दहीहंडी सजविणे या स्पर्धेसाठी एकूण 45 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. स्पर्धेचे परीक्षक नितीन सोनवणे,अनुराधा देशमुख यांनी जबाबदारी सांभाळली. दांडिया स्पर्धेतील विजयी स्पर्धक अनुक्रमे प्रथम हर्षा सनानसे, धनश्री महाजन,कल्याणी कुलकर्णी, द्वितीय सोनल बर्‍हाटे, लावण्या जोशी, नंदिनी देसले, तृतीय वेदांत पाटील, नयन पाटील, हर्षदा पालवे आणि उत्तेजनार्थ भावेश वायकर, नव्या पाटील, पुष्कर चौधरी या सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

प्रास्ताविक शुभांगी नारखेडे, नंदिनी टाकणे यांनी तर सूत्रसंचालन विद्यार्थी मोक्षदा खडके, सार्थक नेवे, मृणाल नेटके, दिव्या राठोड यांनी केले. आभार शुभांगी नारखेडे,अक्षय वाणी यांनी मानले.

इंग्लिश मीडियम स्कूल

पूर्व प्राथमिक विभाग व प्राथमिक विभागात गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधाची वेशभूषा केलेली होती तर काही छान बालगोपाल व बालगोपिका बनून आले होते. प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, समन्वयिका सविता कुलकर्णी यांच्याहस्ते भगवान बाळकृष्णाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रम प्रमुख कामिनी जावळे यांनी गोकुळाष्टमी का साजरी केली जाते? याविषयी माहिती सांगितली. सिनिअर केजीच्या बालगोपालांनी व बालगोपिकांनी गोकुळात कृष्ण जन्माला गं बाई या गाण्यावर रासलीला खेळली व छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल.. हे गीत सादर केलं. यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षिकांनी दांडिया खेळून सहभाग नोंदविला.त्यानंतर दहीहंडी फोडून त्याचा प्रसाद विद्यार्थ्यांना वाटण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com