
रावेर|प्रतिनिधी raver
येथे गणेश जयंतीनिमित्त पाराचा गणपती मंदिरावर आजपासून गणेश उत्सवास सुरुवात झाली आहे. येथे दि.२० ते २५ पर्यंत गणेश जयंतीच्या निमत्ताने गणेश पुराण व ज्ञानयज्ञ आयोजित करण्यात आला आहे.
आजपासून कथेस प्रारंभ होत आहे.कथेचे निरुपण श्रीनिवास बुवा कानिटकर यांच्या अमृत वाणीतून होत आहे.या निमित्त शुक्रवारी दुपारी २.३० वा. दत्त मंदिर येथून ग्रंथ दिंडी निघणार आहे. दरोरोज दुपारी ३ ते ६ कथा होणार आहे. दि.२५ रोजी कथेची सांगता सकाळी ९ ते १२होणार आहे.१२ वा. महाआरती होणार आहे. कथेचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.