श्रावण सोमवार : न्हावीचे प्राचीन राज राजेश्वर महादेव मंदिर

एकाच गाभाऱ्यातील दोन शिवलिंग (छायाचित्र- ललित फिरके)
एकाच गाभाऱ्यातील दोन शिवलिंग (छायाचित्र- ललित फिरके)

ललित फिरके

न्हावी, ता यावल वार्ताहर -

येथील प्राचीन राज राजेश्वर महादेव मंदिर (Ancient Raj Rajeshwar Mahadev Temple) अतिशय पुरातन मंदिर असून काही वर्षांपूर्वी कर्नाटकातील रंगकर्मी (Painters from Karnataka) कडून मंदिराचे सुशोभीकरण (beautification of the temple) करण्यात आले होते. वयोवृद्ध ग्रामस्थांच्या सांगण्यावरून महादेवाची जुनी पिंड काढून नवीन पिंड बसवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र जुनी पिंड काढण्यात ग्रामस्थांना अपयश आले.

न्हावी येथील महादेव मंदिर (छायाचित्र- ललित फिरके)
न्हावी येथील महादेव मंदिर (छायाचित्र- ललित फिरके)

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी पहाटे चार वाजेपासून युवती ,महिला मोठ्या संख्येने मंदिरात पुजा करीत असतात. १०८ बेलाची पाने पिंडीवर वाहून अभिषेक करण्याची प्रथा आजही भाविकांकडून जोपासली जात आहे. लग्न कार्याच्या वेळी शेवंती ( श्रीमंती ) पूजनाचा तसेच मृत्यूनंतर गंध मुक्तीचा कार्यक्रम ही मंदिरात पार पाडला जातो.

मंदिरातील या पुरातन मूर्तीचे नाव अर्धनारी नटेश्वर आहे. जुनी मूर्ती नवस फेडणारी असून आजही या मूर्तीवर भेगा पडलेल्या दिसतात.मंदिराचे प्रवेशद्वार उत्तरा भूमिक असून समोर वडाचा डेरेदार वृक्ष आहे. परिसरात एकाच मंदिरात दोन शिवलिंग असणारे एकमेव राज राजेश्वर महादेव मंदिर सर्व परिसरात परिचित आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com