रावेरात डीएपी खतांचा तुटवडा

दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा
रावेरात डीएपी खतांचा तुटवडा

रावेर|प्रतिनिधी raver

पिकांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी आवश्यक असलेल्या डीएपी रासायनिक खतांचा रावेर तालुक्यात तुटवडा निर्माण झाल्याने,शेतकऱ्यांना डीएपी ऐवजी नाइलाजाने इतर मिश्र खतांचा वापर करावा लागत आहे.ऐन हंगामात तुटवडा पडल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

रावेरात ११ सप्टेंबर रोजी डीएपीचा रॅक प्राप्त झाला होता,त्यानंतर दोन महिने उलटूनही डीएपी न आल्याने पिकांना वाचवण्यासाठी मात्र महाग १०;२६;२६ या खतांचा वापर शेतकरी करत आहे.आता डीएपी नंतर पॉटेश खतांचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे.याबाबत श्रीराम ऍग्रोचे व्यवस्थापक सुनील अग्रवाल यांनी सांगितले की,डीएपी मिळत नसल्याने शेतकरी इतर मिश्र खते खरेदी करत आहे.शेतकऱ्यांच्या दृष्टीने डीएपी स्वस्त आणि प्रभावी रासायनिक खत आहे,मात्र आता तुटवडा पडल्याने शेतकऱ्यांना इतर खते घ्यावी लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com