‘आनंदाचा शिधा’साठी रात्री उशीरापर्यंत दुकानात गर्दी

अपूर्ण शिधा मिळाल्याने नाराजी : साखरेसाठी लागणार पुन्हा रांगा
‘आनंदाचा शिधा’साठी रात्री उशीरापर्यंत दुकानात गर्दी

फेकरी, Fekri ता भुसावळ । प्रतिनिधी

राज्यातील शिंदे सरकारने (Shinde Govt) गरीब रेशनकार्ड धारकांची (Poor ration card holders) दिवाळी (Diwali) कमी खर्चात साजरी होण्याच्या उद्देशाने लाभार्थ्यांसाठी आनंदाचा शिधा ('Anandacha Shidha') शंभर रुपयांमध्ये एक किलो साखर, रवा, खाद्य तेल, चणाडाळचे वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दिवाळी पर्व सुरू होऊनही लाभार्थ्यांना (beneficiaries) आनंदाचा शिधा मिळण्यास अडचणी (Difficulty getting) निर्माण होत विलंबाने वितरण (Delayed delivery) होत आहे. त्यातही साखर उपलब्ध नसल्याने ती नंतर मिळणार आहे. रविवारी रेशन दुकानांवर (ration shops) साखरेविनाच शिधा वाटप झाला. तो घेण्यासाठी लाभार्थ्यानी रात्री उशीरापर्यंत दुकानांवर गर्दी केली होती.

‘आनंदाचा शिधा’ मिळण्यासाठी नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानदारांकडे यापूर्वीच तगादा लावला होते. परंतु आनंदाचा शिधा सणाच्याच दिवशी आल्याने नागरिकांची व स्वस्त धान्य दुकानदार मालकाची चांगलीच तारांबळ उडाली. फेकरी येथील स्वस्त धान्य दुकानांमध्ये ‘शिधा’ सायंकाळी उशिरा आल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. प्रसंगी किटमध्ये साखर नसल्यामुळे फेकरी येथील लाभार्थ्यांची दिवाळी साखरेविना होणार तसेच रात्री उशिरापर्यंत आनंदाचा शिधा किट मिळाल्याने ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तात्काळ फराळ कसा होईल? त्यामुळे कच्च्या फराळाचेच पूजन करावे लागणार असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. काहींना शिधा घेण्यासाठी रात्री उशीरापर्यंत रांगेत उभे राहावे लागल्याने शाररीक व मानसिक त्रास सहन करावा लागला.

हे सर्व नियोजनाचा अभाव झाल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. आनंदाचा शिधा हा दिवाळीपूर्वी देण्यात आला असता तर आम्ही लक्ष्मीपूजनाच्या वेळी त्याचा फराळ करून पूजन केले असते. परंतु आम्हाला रांगेत उभे राहूनच अर्धवट आनंदाचा शिधा घ्यावा लागल्याने नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त करत लवकरच साखरेचेही वाटप करण्यात यावे अशी मागणी केली आहे. याबरोबरच दुकानदार यांना सुद्धा रात्री उशिरापर्यंत दुकानातच थांबावे लागले. सदर लाभार्थ्यांची रांग ही खूप मोठी असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत साखरेविना आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले.

ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड असून सुद्धा त्यांचे रेशनकार्ड हे काही कारणास्तव सुरू नसल्याने ते या योजनेपासून वंचित राहिले असून यांना सुद्धा आनंदाचा सुद्धा हे कीट मिळावे अशी मागणी परिसरातून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com