
भुसावळ - प्रतिनिधी - Bhusawal
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील रेल्वे हॉस्पिटल समोरील कब्रस्तानाजवळ गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी १९ वर्षीय युवकावर गोळीबार केला.
आदित्य लोखंडे असे गोळीबार करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून त्याला डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी घटनास्थळ गाठले. हा हल्ला नेमका कोणी व का केला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी शहर पोलिस ठाण्याची तीन पथके तयार केली असून, तापी नदीचा काठ, तापीचा पूल, तापीनगर, शांतीनगर या भागात शोध घेतला. पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.