नशिराबाद येथे गोळीबार; एक ठार

नशिराबाद येथे गोळीबार; एक ठार

नशिराबाद Nasirabad ।

जुन्या वादातून (old argument) जामिनावर (On bail) सुटून घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार (attackers fired) करून तरुणाची हत्या (Murder of a young man) केल्याची खळबळजनक घटना सायंकाळी नशिराबाद येथील उड्डाणपुलाच्या (Flyover) खाली घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

धम्मप्रिय उर्फ धम्म मनोहर सुरडकर (वय 20) राहणार पंचशील नगर भुसावळ हा आपल्या वडिल मनोहर सुरडकर यांच्यासह जळगाव येथून भुसावळ येथे दुचाकी क्रमांक (एमएच 19 एव्ही 9656) जात असताना सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्ल्यात धम्म सुरडकर हा जागीच ठार झाला आहे. तर सोबत असलेले वडील मनोहर सुरडकर हे गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याचे समजते.

कारण मयत धम्म हा आज सायंकाळी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल कोणाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटून घरी जात असताना ही घटना घडली आहे. गेल्या ११ महिन्यांपासून मयत धम्म सुरडकर हा कारागृहात होता.

घटनास्थळी भुसावळ विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.