धक्कादायक : आ.सावकारेंची गाडी परिवहन मंत्र्यांच्या नावावर

जळगाव आरटीओ कार्यालयाची हेराफेरी; मंत्री अनिल परब यांच्या नावावर परस्पर केली नोंदणी
धक्कादायक : आ.सावकारेंची गाडी परिवहन मंत्र्यांच्या नावावर

जळगाव jalgaon। डॉ.गोपी सोरडे

जिल्ह्यातील भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे (Bhusawal city MLA Sanjay Saavkare) यांच्या मालकीची टोयोटा कंपनीची अलिशान गाडी (Alishan car) चक्क परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्या नावावर ट्रान्सफर (Transfer)करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती (Shocking information) पुढे आली आहे. यावरुन जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (Jalgaon Sub-Regional Transport Office) भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

आमदार संजय वामन सावकारे यांच्या मालकीची (एम.एच.19-सी-झेड-5130) टोयोटा कंपनीची गाडी आहे. त्यांनी ही गाडी अन्य कुणालाही विक्री केली नसतांनाही त्यांच्या मालकीची गाडी जळगाव आरटीओ कार्यालयात दि. 24 डिसेंबर 2021 रोजी परस्पर ट्रान्सफर करुन परिवहन मंत्री अनिल दत्तात्रय परब यांच्या नावे केल्याची माहिती उघडकीस आली आहे. आमदार सावकारेंनी ही गाडी विक्री केली नसतांनाही मंत्री परब यांच्या नावाने नोंदणी कशी केली गेली. असा सवाल उपस्थित होत आरटीओ कार्यालयाचा गलथानपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

यापुर्वीदेखील जळगाव आरटीओ कार्यालयातून मंत्र्यांच्या नावाने लायसन्स् दिले गेले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. असे असतांनाही आतातर चक्क, आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची गाडी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर करुन नोंदणी केली गेली आहे.

पहिल्या गाडी मालकाकडून दुसर्‍याच्या नावावर गाडीची नोंद करण्यासाठी प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात यावे लागते. अनिल परब यांच्या नावावर नोंदणी केली तर, ते प्रत्यक्ष आले होते का? ते जर आले नाही तर, त्यांच्या नावावर गाडी ट्रान्सफर होवून नोंदणी झाली कशी? किंवा पहिल्या गाडी मालकाने गाडीसाठी कर्ज घेतले असेलतर त्याची एनओसी घेतली होती का? असे नानाविध प्रश्न उपस्थित होत आहे.

ही गाडी माझ्याच मालकीची असल्याचा आ.सावकारेंचा दावा

टोयोटा कंपनीची पांढर्या रंगाची (एम.एच.19-सी-झेड-5130) ही तुमची गाडी विक्री केली का? अशी विचारणा केली असता, ही माझ्याची मालकीची गाडी असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी दैनिक ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

टोयोटा कंपनीची गाडी मी नवीनच घेतली आहे. ती माझ्याच मालकीची आहे. मी कशाला विकू. या संदर्भात मला अनेकांचे फोन आले आहे.
संजय सावकारे, आमदार, भुसावळ

Related Stories

No stories found.