धक्कादायक : लग्नाच्या वरातीत भाजप नगरसेवकाने काढली महिलेची छेड

संतप्त नातेवाईकांकडून नगरसेवकाची धुलाई
धक्कादायक : लग्नाच्या वरातीत भाजप 
नगरसेवकाने काढली महिलेची छेड
breaking news

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महानगरपालिकेतील (Municipal Corporation) भाजप नगरसेवक (BJP corporator) तथा पदाधिकरी यांनी मेहरुण परिसरातील एका लग्नात महिलेची छेड (Teasing a woman) काढली. यावेळी संतप्त झालेल्या त्या महिलेच्या नातेवाईकांनी (relatives) त्या नगरसेवकाला बेदम मारहाण (Breathless beating) केल्याचा प्रकार आज दुपारी रामेश्वर कॉलनीतील आदित्य चौकात घडला. या घटनेची दिवसभर शहरात चर्चा सुरु होती.

शहरातील मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनीत लग्नसोहळा होता. याठिकाणी भाजप नगरसेवक हे देखील लग्नाच्या वरातीमध्ये उपस्थित होते. वरातीमध्ये त्या भाजप नगरसेवकाने एका महिलेला त्यांच्या घराची चावी मागत तिची छेड काढली.हा प्रकार त्यामहिलेच्या नातेवाईकांना कळताच संतप्त झालेल्या त्या महिलेच्या नातेवाईकांनी भाजप नगरसेवकाची यथेच्छ धुलाई केली. यावेळी त्या नगरसेवकाचा मुलगा त्याठिकाणी आल्याने त्याला देखील बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे लग्नात एकच गोंधळ उडाला होता. यावेळी त्या महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले होते. परंतु ते दोघ एकाच समाजातील असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची समजूत काढत वादावर पडदा टाकला.

महिलेची छेडखानी काढल्यावरुन महापालिकेतील वरच्या पदावर असलेल्य पदाधिकारी व नगरसेवकाला मारहाण केल्याची वार्ता शहरात पसरली. यावेळी राजकीयसह महापालिकेच्या गोटात दिवसभर या घटनेची चर्चा सुरु होती.अनेकांकडून घटनेला दुजोरा

भाजप नगरसेवकाला मारहाण झाल्याची वार्ता शहरात वार्‍यासारखी पसरली. यावेळी राजकीय क्षेत्रातील अनेकांकडून या घटनेला दुजोरा देण्यात आला. दरम्यान, या घटनेबाबत त्या संबंधित नगरसेवकाला विचारले असता त्यांनी असे काहीच घडले नसल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसात घटनेची कुठलीही नोंद झालेली नसल्याने या वादावर पडदा पडलेला दिसून आला.नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी केली सुटका

मेहरुण परिसरातील या लग्नात महापालिकेतील व राजकीय क्षेत्रातील अनेक पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी वरातीमध्ये धाव घेतली. यावेळी महिलेच्या नातेवाईकांकडून त्या नगरसेवकाला चोप दिला जात असल्याचे बघताच उपस्थित राजकीय पदाधिकार्‍यांनी त्यांच्या मध्यस्थी करीत त्या नगरसेवकाची सुटका केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com