धक्कादायक : ९ पालिकांच्या निवडणुका पण... ओबीसी आरक्षणाशिवाय

 धक्कादायक : ९ पालिकांच्या निवडणुका पण... ओबीसी आरक्षणाशिवाय

जळगाव- jalgaon

जिल्ह्यात स्थगित करण्यात (adjournment in the district) आलेल्या नऊ नगरपालिकांच्या (nine municipalities) निवडणुका (Elections) ओबीसी आरक्षणाशिवाय (without OBC reservation) होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आरक्षण लागू केल्याच्या आधी ज्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यांच्यासाठी हा आदेश दिला आहे.

जिल्ह्यातील भुसावळ सह नऊ नगरपालिकांच्या आता ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आधी जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये आरक्षण लागु करण्यास नकार दिला आहे.

आरक्षणाचा निर्णय होण्याआधीच भुसावळ, रावेर, यावल, चाळीसगाव, अमळनेर, एरंडोल, पारोळा, धरणगाव, वरणगाव, यावल, फैजपूर, या नगरपालिकांची निवडणुक जाहीर करण्यात आली होती.

त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागु होणार नाही. राज्य सरकारने नेमलेल्या आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर राज्यात पुन्हा ओबीसी आरक्षण लागु करण्यात आले. त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

दरम्यानच्या काळात राज्यात काही नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. त्यात जळगाव जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुका होत्या. त्यामुळे आता या आठ नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या जाणार आहेत

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com