Video लग्न सोहळ्यात होतोय शिवरायाच्या नामाचा गजर

मंगलाष्टकांपूर्वी छत्रपती शिवरायांना वंदन
Video लग्न सोहळ्यात होतोय शिवरायाच्या नामाचा गजर

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalsigaon

भारतीय संस्कृतीत लग्न (married) म्हटल की आनंद, उत्साह, आणि उल्लासाचेे वातावरण असते. गेल्या अनेक वर्षांपासून लग्नात धार्मिक परंपरात संस्कृती चालीरीती जोपासल्या जात आहेत. काळाप्रमाणे हळुहळु बर्‍याच चालीरीती लुप्त होत असून लग्नात पाश्‍चिमात्य संस्कृती जोपासली जात आहे. परंतू गेल्या दोन ते तीन वर्षापासून मराठ्यांसह आठरा पगड जातींना सन्मानाचे स्थान देणारे, ज्याचे अर्धे आयुष्य लढाई करण्यातच गेले. (maharastra) महाराष्ट्रात, (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जाणार्‍या छत्रपती शिवाजी महारांजा जयकार व पूजापाठची पद्धत पुन्हा नव्याने सुरु झाली आहे. खास ग्रामीण भागात लग्नमंडपात (Mangalashtak) मंगलाष्टाकंपूर्वी वधु-वर छत्रपती महाराजच्या पुतळा, प्रतिमांचे विधीवत पूजन व आरती करुन महाराजांच्या नावाचा जयघोष केला जात आहे. संद्या लग्नसराईत ग्रामीण भागात ही संस्कृती मोठ्या प्रमाणात पाहवयास मिळत आहे. त्यामुळेे लग्नात उपस्थित प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलत आहे.

विचारी, व्यवहारी, लढवय्ये, कर्तव्यदक्ष, धोरणी, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, कुटुंबवत्सल असे कैक गुण लाभलेले छत्रतपी शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा अभिमान. राजा कसा असावा, राज्य कसे सांभाळावे, नीती कशी मांडावी, कुटुंब आणि प्रजा यांची सांगड कशी घालावी अशा कित्येक गोष्टींची उदाहरणे राजांनी आपल्यासमोर ठेवली आहेत. म्हणूनच फक्त महाराष्ट्रातच नाही तर आख्या हिंदुस्तानात त्यांचे नाव राजाधिराज छत्रपती म्हणून दुमदुमत आहे. १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म झाला. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले. त्याकाळी हिंदुस्तानावर परकीयांची सत्ता होती, प्रजेची होरपळ होत होती. हीच गोष्ट माता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांच्या निदर्शनास आणून दिली, आणि ठिणगी पडली ती स्वतंत्र मराठा साम्राज्य उभे करण्याच्या महत्वकांक्षेची. आपल्या प्रजेला सुखी ठेवण्यासाठी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध त्यांची लढाई होती. याला सुरुवात झाली ती १६४७ साली, जेव्हा वयाच्या सतराव्या वर्षी अवघ्या काही मावळ्यांच्या मदतीने त्यांनी तोरणा जिंकला. तलवारीशी झालेले हे लग्न अगदी शेवटपर्यंत टिकले, म्हणूनच त्यांचे अर्धे आयुष्य लढाई करण्यातच गेले. त्यामुळे महाराष्ट्रात आज प्रत्येक जण सुरक्षित आणि सुखात राहत आहे.

Video लग्न सोहळ्यात होतोय शिवरायाच्या नामाचा गजर
सावधान ; पुढील पाच दिवस उष्णतेची लाट
Video लग्न सोहळ्यात होतोय शिवरायाच्या नामाचा गजर
Blog : मनसेनेचा हिंदुत्वाचा 'भोंगा' शिवसेनेला धोकादायक?

ज्या छत्रपतीमुळे अठरापकड जातींना अभय मिळाले आशाचा छत्रपतीचे प्रत्येक कार्यक्रमात नामस्मरण होतेच. परंतू गेल्या काही वर्षात पाश्‍चिमात्य संस्कृतीमुळे लग्न संभारभात देखील चंगलवाद सुरु झाला आहे. मोठ्या लग्नसमारंभात पाश्‍चिमात्यांचे अनुकरण करुन, त्याच्या पध्दतीने लग्नात बडेजाव केला जात आहे. अलीकडे तर साखरपुड्यात, लग्नात केक कापला जातो. तसेच पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या चालीरीती, पेहराव धारण करुन सारखपुडा व लग्न केली जात आहेत. परंतू खर्‍या अर्थाने ज्या रयतेच्या राजामुळेे आज आपली लग्न होवून कुटुंब संस्कृती सुरक्षित आहेत. त्याच राजांचा विसर काहींना पडत चालला होता.

मात्र गेल्या काही वर्षापासून ग्रामीण भागात अनेक लग्नामध्ये मंगलाष्टाकंपूर्वी वधु-वरांकडून छत्रपती शिवराच्या पुतळ्याची पूजा-अर्जा करुन आरती केली जात, आणि मगच लग्न लावली जात असल्याची प्रथा रुढ होत चालली आहे. संद्या लग्नसराईत ग्रामीण भागात ही संस्कृती मोठ्या प्रमाणात पाहवयास मिळत आहे. तर लग्नात डिजेच्या तालावर जय..जय...जय शिवरायाचा जयघोष होत असून नाचणार्‍या तरुणांमध्ये उत्साह संचारात असल्याचे दिसून येत आहे. लग्नासारख्या पवित्र समारंभात पाश्‍चिमात्य संस्कृती हद्दपार होवून, शिवसंस्कृती जोपासली जात आहे.

शिवआचार, विचारांसाठी लग्नात पुस्तक भेट

भोसले कुळातील सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. त्या राजांचे आचार-विचार देखील लग्नासमारंभात पुस्तक रुपी भेट देवून जोपासले पाहिजे, आठरा पकड जाती असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक लग्नात शिव विचारांची जोेपसना करण्यासाठी पुस्तके भेट देण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात सुरु केली पाहिजे, काही तुरळक लग्नांमध्येे पुस्तके भेट दिल्याचे दिसत आहे. परंतू मराठ्यांच्या प्रत्येक लग्नांमध्येे शिव विचारांचे पुस्तके भेट देणे ही काळाची गरज आहे. तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात शिवसंस्कृती जोपासली जाईल, आणि मराठाममोळी संस्कृती जिवंत राहिल, आजच्या चंगळवादाच्या युगात लग्न टिकवणे ही देखील एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच नवदांपत्यांमध्ये लग्ननतंर आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढले. तर कुटुंबात स्त्रीला दुय्याम स्थान देवून तिचा छळ गेल्या अनेक पिंढ्यांपासून होत आहे. हे बंद होण्यासाठी, आणि महारांजाच्या विचारांवर चालण्यासाठी तरुणांच्या हातात शिवविचारांचे पुस्तक भेट देवून, पुढील पिढ्यांसाठी शिवाविचारांचा वारसा जोपासणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.