गनिमी कावा आणि युध्द नितीचे जनक शिवाजी महाराज - प्रा.धनंजय जवळेकर

गनिमी कावा आणि युध्द नितीचे जनक शिवाजी महाराज - प्रा.धनंजय जवळेकर

चोपडा Chopda प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अठरा पगड जातींना भगव्या झेंड्याखाली आणून महाराष्ट्रात सुशासन (Good governance) निर्माण करण्याचे काम केले. पाच शाही व मोगल सेनेला नमवून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले.अंतर्गत बंडाळ्या व प्रशासनातील अडथळे दूर करून महाराजांनी युद्ध कलेच्या (art of war) सहाय्याने स्वराज्य निर्माण केले. चंद्रराव मोरे यांचा पाडाव,अफझलखान प्रकरण, शाहिस्तेखानाचा बंदोबस्त,सिद्दी जोहरची पन्हाळा मोहिम व सुरतेची बे सुरत इत्यादी मोहिमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध नितीचा (war strategy) अवलंब करून दुष्मनाला नमविण्याचे काम केले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गनिमी कावा(Guerrilla warfare) व युध्द नितीचे जनक होते असे प्रतिपादन प्रा. धनंजय जवळेकर (Prof. Dhananjay Javalekar) यांनी केले.

येथील पंकज कला व विज्ञान महाविद्यालयातील (Pankaj College of Arts and Sciences) इतिहास विभाग,विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमात श्री संत गजानन महाराज महाविद्यालय (Shri Sant Gajanan Maharaj College) खर्डा (Kharda)) येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा.धनंजय जवळेकर (Prof. Dhananjay Javalekar) शिवाजी महाराजांची गनिमी कावा युद्धनीती या विषयावर ऑनलाइन व्याख्यानात बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.महादेव वाघमोडे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण, स्त्री विषयक धोरण, जलनीती,मावळ्यांप्रती असलेली आस्था, शेतकऱ्यांविषयी असलेली आस्था, शेत सारा, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही याचे उदाहरण देऊन डॉ.महादेव वाघमोडे (Dr. Mahadev Waghmode) यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला.

सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा.दिलीप गिर्‍हे यांनी महापुरुषांच्या जयंती साजरी करून त्यांच्या विचारांची रुजवण (Rooting of thoughts) अशा कार्यक्रमातून होत असते शिवाजी महाराजांच्या एकंदरीत जीवन आत्मसात करून त्या मार्गाने जीवन जगण्यास मानवी जीवन सुकर होईल असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.किशोर पाठक यांनी केले तर आभार प्रा.अजय पाटील यांनी मानलेत.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com