शिवसेनेची मुलुखमैदान तोफ १ नोव्हेंबरला धरणगावात 

शेतकऱ्याचे गाऱ्हाणं मांडणार : सरकारला जाब विचारणार - निलेश चौधरी
शिवसेनेची मुलुखमैदान तोफ १ नोव्हेंबरला धरणगावात 

धरणगाव Dharangaon प्रतिनिधी

उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेतर्फे (Shiv Sena) महाराष्ट्रात आपली भूमिका (present a role in Maharashtra) मांडण्यासाठी प्रबोधन यात्रा (Enlightenment Journey) सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेची मुलुख मैदान तोफ (Shiv Sena's Mulukh Maidan cannon) म्हणून सुषमा अंधारे (Sushma Andhare) महाराष्ट्रात आपल्या प्रभावशाली वक्तृत्वाने गाजत आहेत. ही यात्रा १ नोव्हेंबर रोजी धरणगावात दाखल होणार आहेत. त्यांचीे धरणगावात (Dharangaon) जाहिर व्याख्यान (Public lecture) होणार आहे. या प्रसंगी त्या शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडून, सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती शिवसेनेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिली.

 १ नोव्हेंबर रोजी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचा वाढदिवस असून त्या निमित्ताने ही प्रबोधन यात्रा धरणगावातून सुरु होवून पुढे ती पाचोरा आणि पारोळा तालुक्यात जाणार आहे. अकाली पावसाने शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यास योग्य तो न्याय देण्यास सरकार अपयशी ठरलं आहे. त्याबाबत या प्रबोधन यात्रेतून सरकारला जाब विचारला जाईल असे निलेश चौधरी म्हणाले. 

  मंत्री अब्दुल सत्तार हे कृषी मंत्री नसून ते शेठ सावकारासारखे वागत आहेत. आदित्य ठाकरे यांना अर्वाच्च भाषेत बोलत आहेत. ज्यांनी त्यांना सत्तेत वाटा दिला, त्या ठाकरे कुटुंबावर टिका करण्याची त्यांची लायकी नाही. असे म्हणत निलेश चौधरी यांनी सत्तार यांचा जाहिर निषेध केला. 

   महाराष्ट्रातील इडी सरकार हे अनैतिक सरकार आहे. त्यात अंतर्गत कलह सुरु झाला आहे. आ. बच्चू कडू आणि आ. राणा एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. ही सुरवात असून, या कलहातच हे सरकार कोसळेल असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला. सभेला उपस्थितीचे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी ॲड. शरद माळी, भागवत चौधरी. धिरेंद्र पुरभे, राहूल रोकडे, भिमराज धनगर पप्पू कंखरे, हे उपस्थित होते. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com