शिंदे सरकारविरुद्ध तोफ डागण्यासाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आज जळगाव जिल्ह्यात

शिंदे सरकारविरुद्ध तोफ डागण्यासाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आज जळगाव जिल्ह्यात

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शिंदे सरकारविरुद्ध (Against the Shinde government), आपल्या भाषणांनी महाराष्ट्र गाजवलेल्या (Maharashtra is celebrated) शिवसेनेच्या बुलंद तोफ (High cannon of Shiv Sena) तथा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Deputy Leader Sushma Andhare) ह्या जिल्ह्यातील युवासैनिकांना (youth soldiers) जोश पूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन (Guidance) करण्यासाठी महाप्रबोधन यात्रेनिमित्त (Mahaprabodhan Yatra) 1 ते 4 नोव्हेंबरदरम्यान जळगाव जिल्ह्याच्या (tour of Jalgaon district) दौर्‍यावर येणार आहे.

मंगळवार दि.1 नोव्हेबर रोजी सकाळी 6 वाजता सुषमा अंधारे यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहे. पुढील चार दिवसात जळगाव लोकसभेतील धरणगाव, पारोळा व पाचोरा तसेच रावेर लोकसभेतील चोपडा व मुक्ताईनगर येथे सभा घेणार आहेत.

या यात्रेदरम्यान दि.1 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता हॉटेल के.पी.प्राईड जळगाव येथे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत व युवासेना विस्तारक शरद कोळी हे जळगाव जिल्ह्यातील युवासेना पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, शिवसेना जिल्हासंघटक गजानन मालपुरे, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जळगाव जिल्हा विस्तारक चैतन्य बनसोडे, विस्तारक किशोर भोसले आदी मान्यवर उपस्थित राहतील.

तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व युवासैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवासेना जिल्हा युवा अधिकारी निलेश चौधरी, पियुष गांधी, चंद्रकांत शर्मा यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी जळगाव लोकसभा कॉलेज कक्ष युवा अधिकारी प्रितम शिंदे, महानगर युवाअधिकारी अमोल मोरे, यश सपकाळे, विधानसभा युवा अधिकारी अमित जगताप आदी परीश्रम घेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com