बाजार समितीसाठी शिवसेनेनेही ठोकला शड्डू

निवडणूक । युतीचा निर्णय मंत्री घेणार; मेळाव्यात उमेदवारांची चाचपणी
बाजार समितीसाठी शिवसेनेनेही ठोकला शड्डू

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार (Agricultural Produce Market Committees) समित्यांच्या निवडणूका (Elections) जाहीर झाल्या असून शिवसेनेनेही (Shiv Sena) या निवडणुकांसाठी शड्डू ठोकला आहे. आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद (Zilla Parishad Elections) निवडणुकांची ही रंगीत तालीम असल्याने ह्या निवडणुकांसाठी गुरूवारी झालेल्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.

जिल्ह्यात बाजार समितीची निवडणुकीच्या धामधूम सुरू सुरू झाली आहे. यामध्ये शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काल महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. मविआने बाजार समितीच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनल देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी जिनिंग येथे गुरूवारी पार पडला.

या मेळाव्याला जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जिल्हा उपतालुका प्रमुख नाना सोनवणे, उपाध्यक्ष माजी सभापती कैलास चौधरी, माझी सभापती नंदू पाटील, डॉ कमलाकर पाटील, अनिल मोरे, पंकज पाटील, जितेंद्र पाटील, सुरेश पाटील नांद्रा, मुरलीधर पाटील, शांताराम सोनवणे, बापू महाजन, दिलीप अगिवाल, दगडु चौधरी, जितू अत्रे, वसंत भालेराव, सचिन पाटिल, चंद्रशेखर पाटील, रमेश जळकेकर, पि.के पाटील, अर्जुन पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बाजार समिती स्वतंत्र लढण्यावर चर्चा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्वतंत्र लढायचे की भाजपासोबत युती करायची याबाबत मंथन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून स्वतंत्र लढण्याबाबतचा सूर आवळण्यात आला. जळगाव तालुका सह ग्रामीण भागात सर्वाधिक ग्रामपंचायत विकास सोसायटी या शिवसेनेच्या ताब्यात असून यासाठी स्वतंत्र लढल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेच्या पदरात पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

मंत्रीद्वयींसह पदाधिकार्‍यांची रविवारी बैठक

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या की युती करून याबाबतचा निर्णय भाजपाचे मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन, आमदार राजुमामा भोळे, माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत रविवारी होणार्‍या बैठकीत घेतला जाणार आहे. या मेळाव्याला जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासो चेअरमन, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com