Photo # धरणगावात शिवसेनेचे पाण्यासाठी आंदोलन

मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हार, हंडा मोर्चा, उड्डान पुलावर रास्तारोको
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हार
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हार

धरणगाव - प्रतिनिधी dharangaon

शहरात गेल्या २० ते २५ दिवसापासून पाणी पुरवठा (Water supply) होत नसल्यामुळे संतप्त महिलांनी गुरुवारी पालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. मुख्याधिकारी हे कार्यालयात नव्हते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी त्यांना पालिकेत येण्याची विनंती केली. परंतू मुख्याधिकारी न आल्यामुळे शिवसैनिक (Shiv Sainik) चांगलेच आक्रमक होत, त्यांनी थेट उड्डाण पुलावर (fly bridge) रास्तारोको सुरु केले.

गुरुवार बाजारचा दिवस असल्याने प्रचंड गर्दी जमली. वाहतूक खोळंबली. तेव्हा मुख्याधिकारी आले. त्यांनी समस्या लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आले. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर पुन्हा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात पालिकेवर मोर्चा धडकला. परंतू याठिकाणी जबाबदार अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे नागरिक अधिकचे संतप्त झाले होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत कॅबीनला टाळे ठोकून, आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला.

या मोर्चात संतप्त महिला, नागरीक अबालवृद्ध शेकडोंच्या संख्येने हंडा व मडक्यासह सहभागी होऊन पालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देत होते. पालकमंत्री आपल्या मतदार संघात शुध्द आणि पुरेसे पाणी देवू शकत नाही, ही शोकांतिका अनेकांनी व्यक्त केली.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, धीरेंद्र पुरभे, भरत महाजन, लक्ष्मण महाजन, शरद माळी, संतोष सोनवणे, गोविंद कंखरे, भागवत चौधरी, कृपाराम महाजन, महेश चौधरी, जयेश महाजन, दिलीप महाजन, बाळू महाजन, रामकृष्ण महाजन, बापू महाजन, विलास पवार, सुनील जावरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com