पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ.चंद्क्रांत पाटील यांच्या फोटोला शिवसैनिकांनी लाथांनी तुडवले

रावेरात शिवसैनिकांनी बंडखोरांचा नोंदवला निषेध
रावेरात पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला पायदळी तुडवताना शिवसैनिक
रावेरात पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला पायदळी तुडवताना शिवसैनिक

रावेर Raver|प्रतिनिधी-

राज्यात शिवसेनेचे आमदार फुटून (Shiv Sena MLAs split) सत्ता संघर्ष (Power struggle) निर्माण झाल्याने,या घटनेने तीव्र पडसाद राज्यात उमटत आहे.जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्र्यासह (Guardian Minister Gulabrao Patil) पाच आमदार शिंदे गटात (Shinde group) सामील झालेले असल्याने,शिवसैनिक आक्रमक (Shiv Sainik aggressive) झाले आहे.

रविवारी रावेरात शिवसैनिकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे फोटो पायदळी तुडवले. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून विरोध नोंदवला आहे.

यावेळी प्रमोद कोंडे,निलेश महाजन,शिवसेना उप शहर प्रमुख संतोष महाजन,राजू महाजन व शिवसैनिक उपस्थित होते.सदरील प्रकार घडला त्यावेळी रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर व प्रमुख पदाधिकारी देखील परिसरात होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com