शिंदे उपरे;बाजार समितीचे लचके तोडणारे.....?

व्यापारी बैठकीत आमदारांचे शिंदे परिवारावर आरोप, शेतकरी-व्यापारी-हमाल मापाडी बाजार समितीच्या रथाची चाके
शिंदे उपरे;बाजार समितीचे लचके तोडणारे.....?

पाचोरा Pachora प्रतिनिधी

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pachora Agricultural Produce Market Committee) निवडणूकीच्या (election) पार्श्वभूमीवर पाचोरा येथे शिवसेना -भाजप युतीचे (Shiv Sena-BJP alliance) शेतकरी विकास पॅनलचे (Farmer Development Panel) शहरातील जैन पाठशाळा दि. २५ रोजी सायंकाळी सात वाजता पॅनल प्रमुख आमदार किशोर पाटील (MLA Kishore Patil) यांच्या मार्गदर्शनात व्यापारी बैठक (Business meeting) आयोजित करण्यात आली होती.

यावेळी व्यासपीठावर रतनलाल संघवी, मा. नगराध्यक्ष संजय गोहील ,उपनगराध्यक्ष शरद पाटे, बंडू चौधरी ,उमेदवार गोविंद अग्रवाल, मनोज सिसोदिया, सुभाष अग्रवाल, जगदीश पटवारी, पुरषोत्तम अग्रवाल, दिनेश बोथरा, जीवन जैन, पप्पू वाणी,

प्रमोद सोनार,चंदू अग्रवाल, प्रशांत अग्रवाल,अय्युब बागवान, नसीर बागवान, भरत वाणी संजय सिसोदिया, मनोज सिसोदिया आदी उपस्थित होते.

आमदारकीच्या ८ वर्षाच्या कार्यकाळात शहराचा चेहरा मोहरा बदलवला आहे. मागील २० ते २५ वर्षात बाजार समितीत कुठल्याही सुविधा नाही होत्या. किशोर अप्पांच्या नेतृत्वात समितीत सत्ता असताना शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी यांना अनेक सुविधा मिळाल्या .समितीच्या राजकारणात काही सत्ताधाऱ्यांनी व्यापार्यांचा वापर करून नाममात्र संचालक ठेवले. त्यांना मानाची पदे दिली नाही व्यापार्याचे वार्षिक परवाने पुर्ववत करण्यासाठी त्रास देण्यात आला. भाजीपाला खरेदी विक्री करणाऱ्यांना बाहेर बसावे लागत होते. अशा अडचणी व्यापारी बैठकीत व्यक्त करण्यात आल्या असे मनोगत व्यापारी बांधवांनी मांडले.

व्यापारी मेळाव्याला मार्गदर्शन करतांना आमदार म्हणाले की राजकारण करताना व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही अशी शिकवण स्व. आर.ओ. तात्या पाटील यांनी मला दिली त्याप्रमाणे मी काम करत आहे .मागील दहा वर्षात व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा माल मातीत आणी क्विंटल मोजावा लागत होता. व्यापार्याना कुठल्याही सोयी-सुविधा नव्हत्या.आमच्या सहा वर्षांचा कार्यकाळात काॅक्रीटीकरण ,इलेक्ट्रॉनिक तोल काटा , माती परीक्षण केंद्र ,शेतकरी निवारा या सुविधा दिल्या.

ठिय्या लिलाव सुरू केले .भडगाव उप बाजार समितीत व्यापार निर्मिती केली. वरखेडी येथे नवीन समीती उभारली, व्यापार्यांसाठी ८० दुकानाची निर्मिती करून बाजार समितीचे उत्पन्न वाढविले. सतिष शिंदे यांच्यावर टिका करतांना म्हणाले की सतिष शिंदे यांनी वरखेडी येथील शेतकऱ्यांना दादागिरी व मारहाण केली .व्यापाऱ्यांना लायसन्स रिनीव करण्यासाठी त्रास दिला.डी. डी.आर मार्फत व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. माजी संचालक संजय सिसोदिया यांच्या मशनिरीची तोड- फोड केली .आमच्यावर कोल्हे लांडगेचे आरोप करणारे शिंदे उपरे आणि बाजार समितीचे लचके तोडणारे....... ?आहेत

दिलीप वाघ यांचेही बाजार समितीच्या विकासात फारसे कर्तृत्व नाही. आमदारांनी शेवटी आव्हान दिले की, येत्या ३० तारखेला बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनलचा झेंडा फडकल्यानंतर शिंदेनी घेतलेल्या ६४ एकर जागेचा लिलाव रद्द करणार. समितीची एक इंच ही जागा कोणाला विकत घेऊ देणार नाही.

बैठकीला मोठ्या प्रमाणात व्यापारी उपस्थित होते . सुत्रसंचलन व आभार प्रविण ब्राम्हणे यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com