
जळगाव - jalgaon
राष्ट्रवादी (ncp) काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राज्यातील दिग्गज मंत्री हे आज जिल्ह्यात आले आहे. जळगाव विमानतळावर आगमन होताच महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांनी खा.शरद पवार यांच्यासह इतर मंत्र्यांचे स्वागत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्यासह ना.जयंत पाटील (Jayant Patil), ना.प्राजक्त तनपुरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, नेते आज शुक्रवारी जळगावात होत असलेल्या महिला परिषदेसाठी जळगावात आले आहेत. सकाळी १० वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले.
जळगाव विमानतळावर महापौर जयश्री महाजन यांनी खा.शरद पवार, मंत्री ना.जयंत पाटील, प्राजक्त तनपुरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
जळगाव शहरातर्फे महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले तसेच आदरणीय खा.श्री.पवार साहेबांचे आशीर्वादही घेतले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते ॲड.रविंद्रभैय्या पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.