वरणगाव फॅक्टरीत वाढत्या तापमानामुळे भीषण आग

वरणगाव फॅक्टरीत वाढत्या तापमानामुळे भीषण आग

वरणगांव Varangaon फॅक्टरी (वार्ताहर

वरणगांव आयुध निर्माणी (Varangaon Ordnance Factory) मध्ये चार वाजेच्या सुमारास सुरक्षेचे चार आणी पाच नंबर च्या घुमटी च्या मधे आग (fire) लागली होती. आग एवढी भीषण होती कि  बाहेरून ९ फायर  वाहने (Fire Brigade) बोलाविण्यात आले होते . दिड तासा नंतर आग आटोक्यात (fire was brought under control) आणली गेली होती . आग गवताला लागल्या ची प्राथमिक माहीती मिळत आहे .

वरणगाव फॅक्टरीत वाढत्या तापमानामुळे भीषण आग
Big Breaking # 2000 रूपयांच्या नोटेबाबत आरबीआयने घेतला मोठा निर्णय... वाचाच अन्यथा होऊ शकते नुकसान
वरणगाव फॅक्टरीत वाढत्या तापमानामुळे भीषण आग
दोन दिवसात फुकट्या प्रवाशांकडून दोन लाख 98 हजारांचा दंड वसुल

भुसावळ,सावदा, रावेर,जळगांव, फैजपूर, दीपनगर, जामनेर या ठिकाणाहून आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेड च्या गाड्या बोलाविण्यात आलेल्या होत्या .      सर्व अधिकारी व कर्मचारी याठिकाणी शर्थीचे प्रयत्न करीत होते . जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी वरणगांव आयुध निर्माणी येथे घटनास्थळी भेट दिली आहे .

वरणगाव फॅक्टरीत वाढत्या तापमानामुळे भीषण आग
VISUAL STORY : गळ्यात नको ते घालून उर्वशी रौतेलाने केला कहर

दुपारी चारच्या सुमारास कारखान्याच्या आतील परिमितीच्या भिंतीला आग लागली. उन्हाळा आणि वादळी हवामानामुळे ते लवकर पसरते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ओएफव्ही अग्निशमन युनिटसह जळगाव महानगरपालिका, भुसावळ नगरपरिषद, सावदा नगरपरिषद, दीपनगर औष्णिक प्रकल्प, आयुध निर्माणी भुसावळ आणि जैन इरिगेशन जळगाव यांच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

जिल्हाधिकारी अमन मित्तल , गजेंद्र हिरे वनसंरक्षक वन नाशिक यांनी घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग आटोक्यात आल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवित वा मालमत्तेची हानी झालेली नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com