धक्कादायक ; जिल्ह्यात विविध घटनेतत सात जणांचा मृत्यू

धक्कादायक ; जिल्ह्यात विविध घटनेतत सात जणांचा मृत्यू

जळगाव - jalgaon

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात विविध घटनेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनांनी जिल्हा हादरला. घात, पात अपघात हे तर नित्याचेच झाले आहेत. मात्र सर्वाचे आराध्य दैवत श्री गणरायाचे आगमन झाले आणी सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच जणांवर बंधणे होती. ती यावेळेस नसल्याने गणेशोत्सव जल्लोषात साजरा झाला. मात्र हे करत असतानाच एकीकडे आनंद तर दुसरीकडे दुखाचे डोंगर कोसळले. यात दोनच दिवसात वेगवेगळ्या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला.

पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू

जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ धारागिर शिवारात असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा अंत झाला. यात निलेश मिस्त्री (वय १७) व श्रवण पाटील (वय १५) या दोघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी घडली.

वीज पडून पितापुत्राचा मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथे गणेश विसर्जनाच्या दिवशी दुसारी २ वाजेच्या सुमारास अंगावर वीज कोसळून बाप लेकाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना तालुक्यात घडली. आबा शिवाजी चव्हाण (वय ४५) व मुलगा दीपक आबा चव्हाण (वय १४) हे दोघं कपाशीला खत देत असताना अचानक आलेल्या पावसात वीज कोसळली व यात बाप लेक जागीच ठार झाल्याच्या घटनेने जिल्हा हादरला.

कांताई बंधाऱ्यात तरूणाचा मृत्यू

जळगावच्या समता नगरातील भगवान नामदेव राठोड (वय १८) या तरूणाचा कांताई बंधाऱ्यात श्री विसर्जना दमऱ्यान बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना दि.९ रोजी चार वाजेचच्या सुमारास घडली.

कांग नदीपात्रात बुडून तरूणाचा मृत्यू

जामनेर येथील गणेशवाडी भागातील रहिवासी किशोर राजू माळी वय 30 हा घरी स्थापना केलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेला असता बोदवड पुलाजवळ काँग नदीपात्रात त्याचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

विसर्जनासाठी गेलेल्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु. येथील १७ वर्षीय मुलाचा गणपती विसर्जन प्रसंगी डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना गणेश विसर्जनाच्या दिवशी घडली. सौरव शत्रुघ्न मोरे (वय १७) हा तीन मित्रांसोबत गणपतती बुडविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. यावेळी दोघं मित्र पाण्याच्या बाहेर उभे होते. मात्र सौरवला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com