भुसावळातील कुख्यात निखिल राजपुतसह सात जण फरार

१९ मे पर्यंत हजर न झाल्यास संपत्ती होणार जप्त : आरोपींची माहिती असल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन
भुसावळातील कुख्यात निखिल राजपुतसह सात जण फरार

भुसावळ (Bhusawal) प्रतिनिधी - पोलिसांवर केलेल्या हल्ल्यातील आरोपी निखिल राजपूत (Nikhil Rajput) सह सात जणांवर बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी हे पसार झाले असून आरोपींना १९ मे पर्यंत न्यायालयात (Court) हजर न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त कण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजापेठ पोलीस ठाण्यात ((Bhusawal) गु.र.नं. ६६/२१, भांदवि कलम ३०७, ३५३, ३३२, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र संगठीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निखिल राजपूतसह सहा आरोपी फरार असून अति. जिल्हा व सत्र न्यायालय, विशेष न्यायालय (मोका कोर्ट), भुसावळ यांनी या सात आरोपीतांना कोर्टात हजर होण्याकरीता उद्घोषणा नोटीस आदेशीत केलेली आहे. यानुसार सदर आरोपी १९ मे पर्यंत न्यायालयात हजर न राहील्यास त्यांच्या विरूद सी.आर.पी.सी. कलम ८३ प्रमाणे त्यांची संपत्ती जप्त करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे.

फरार झालेल्या आरोपींमध्ये आरोपी निखील सुरेश राजपुत (वय २८ वर्षे, रा. दत्तनगर, श्रीराम नगर, वांझोळा रोड, भुसावळ), अक्षय प्रताप न्हावकर ऊर्फ थापा (वय २४ वर्षे, रा. चक्रधर नगर, रोटरी हॉल जवळ, भुसावळ), नकुल थानसिंग राजपुत (वय २८ वर्षे, रा. चंदाबाई सोसायटी, आंबेडकर वसतिगृह जवळ, भुसावळ), आकाश गणेश पाटील (वय २३ वर्षे, रा. नारायण नगर, शिरपुर कन्हाळा रोड, भुसावळ), अभिषेक राजेश शर्मा (वय २१ वर्षे, रा. चमेली नगर, वांजोळा रोड, भुसावळ), निलेश चंद्रकांत ठाकुर (वय २१ वर्षे, रा. श्रीराम नगर, दत्त मंदिराच्या जवळ, भुसावळ), चेतन संतोष पाटील (वय २१ वर्षे, रा. श्रीरामनगर, वांजोळा रोड, भुसावळ) हे या गुन्हयातील आरोपी असुन ते फरार आहेत.


सदर आरोपिंविरुद्ध अति. जिल्हा व सत्र न्यायालय, विशेष न्यायालय (मोका कोर्ट), भुसावळ यांनी नमुद आरोपीतांना कोर्टात हजर होण्याकरीता उद्घोषणा नोटीस आदेशीत केलेली आहे. परंतू, नमूद आरोपी हे दि. १९ मे २०२२ रोजी पर्यंत न्यायालयात हजर न राहील्यास त्यांचे विरूद सीआरपीसी कलम ८३ प्रमाणे त्यांची संपत्ती जप्त करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. सदर आरोपींबाबत कोणास काहीएक माहिती मिळाल्यास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय (फोन ०२५८२- २४१६३३) तसेच भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. (फोन नं. ०२५८२-२२२३९९) वर संपर्क साधुन माहिती द्यावी असे आवाहन. डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com