बढे पतसंस्थेच्या सात संचालकांना अटक

बढे पतसंस्थेच्या सात संचालकांना अटक
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

वरणगाव । Varangaon

येथील बढे पतसंस्थेच्या (Badhe Patsanstha) संचालकांवर सीआयडी (CID)पथकाने आज अचानक धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले आहे, तर काही संचालक फरार आहेत अधिक तपास करता बुलढाणा येथे घेऊन गेले असल्याची माहिती वरणगाव (Varangaon) पोलिसांनी दिली आहे.

वरणगाव (Varangaon) येथील बढे पतसंस्थेकडे (Badhe Patsanstha) 35 वर्षापूर्वी तीनशे कोटींच्या जवळपास ठेवी होत्या. या संस्थेत आर्थिक भ्रष्टाचार झाल्यामुळे ही पतसंस्था डबघाईस आली आणि आता या परिसंस्थेवर अवसायक बसलेला आहे. ठेवीदारांच्या ठेवींचा परतावा न झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठेवीदारांनी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल केले होते, यापैकी बुलढाणा येथे 1 जानेवारी 2013 ला दोन लाख वीस हजार रुपये ठेव व रकमेवरील व्याज न मिळाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी बुलढाणा येथील सीआयडीच्या पथकाने वरणगाव शहरात येऊन बढे पतसंस्थेच्या सात संचालकांना अटक केली यामध्ये चंद्रकांत बढे, राजेंद्र चौधरी , भागवत पाटील, बळीराम माळी, गोंविद मांडवगणेे, भिंकू वंजारी, विजय वाघ या सात संचालकांना ताब्यात घेतले तर उर्वरित संचालक फरार झाले असून त्यांचा शोध पोलिसांच्या वतीने सुरू होता या पथकामध्ये उपविभागीय अधिकारी अनिल पवार , उपविभागीय अधिकारी शितल मदने , पी आय शेळके , पोहे कॉ मनोज नाफळे , प्रशांत गळवडे , कुळकर्णी पथकात अमरावती व वासीम विभागाचे पोलिस पदाधिकारी कर्मचारी होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com